मुंबईकरांसाठी खुशखबर ! विरार-अलिबाग कॉरिडोरबाबत झाला ‘हा’ मोठा निर्णय; आता ‘या’ महिन्यात सुरु होणार काम, पहा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Virar Alibaug Corridor News : राज्यात सध्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून वेगवेगळे रस्ते विकासाची कामे केली जात आहे. मुंबईमध्ये देखील राज्य रस्ते विकास महामंडळाकडून काही प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत.

राजधानी मुंबईमध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण देखील वेगवेगळ्या रस्ते विकास प्रकल्पांवर काम करत आहेत. दरम्यान आता राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून तयार होत असलेल्या विरार अलिबाग कॉरिडॉर बाबत एक मोठी माहिती हाती आली आहे. मुळात हा प्रकल्प एम एम आर डी ए चा होता.

हे पण वाचा :- पंजाबराव डख म्हणताय की उद्यापासून आणखी ‘इतके’ दिवस पाऊस पडणार ! कोणत्या जिल्ह्यात पडणार पाऊस? पहा…

मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे एमएमआरडीला हा प्रकल्प लवकर पूर्ण करणे अशक्य होते यामुळे राज्य शासनाने हा प्रकल्प राज्य रस्ते विकास महामंडळाकडे सुपूर्द केला आहे. वास्तविक हा प्रकल्प जवळपास दहा ते बारा वर्षांपासून रखडला आहे. मात्र आता या प्रकल्पाला गती मिळणार असल्याचे चित्र आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या प्रकल्पासाठी भूसंपादन करणे हेतू कर्ज उभारणीस राज्य रस्ते विकास महामंडळाला मान्यता मिळाली आहे. राज्य मंत्रिमंडळाने ही मान्यता दिली असून आता भूसंपादनासाठी निधी उपलब्ध होणार असल्याने या प्रकल्पाला गती मिळणार आहे. यासाठी आता निधी उपलब्ध होणार असल्याने मे महिन्यापर्यंत या प्रकल्पासाठी भूसंपादन केले जाणार आहे.

हे पण वाचा :- खुशखबर! सरकारी नोकरभरतीत आता नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र लागणार नाही; सरकारने घेतला मोठा निर्णय

भूसंपादनासाठी जवळपास 22 हजार कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. हा मार्ग किंवा कॉरिडोर हा १२८ किमी लांबीचा आहे. या कॉरिडोरमध्ये १६ मार्गिका राहणार आहेत. या प्रकल्पासाठी जवळपास १३०० हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार आहे.

जमीन ताब्यात घेतल्यानंतर या प्रकल्पासाठी बांधकामाच टेंडर काढलं जाईल अन या टेंडर प्रक्रियेसाठी जवळपास सात ते आठ महिन्यांचा कालावधी लागेल आणि प्रत्यक्षात बांधकाम हे पुढील वर्षी म्हणजे 2024 मध्ये सुरू होईल अशी माहिती एमएसआरडीसीकडून देण्यात आली आहे. एकंदरीत या अतिमहत्त्वाच्या प्रकल्पाचे काम पुढल्या वर्षात सुरू होणार आहे. हा मार्ग बांधून तयार झाल्यानंतर विरार आणि अलिबाग दरम्यान प्रवास सोयीचा होणार असून प्रवाशांच्या वेळेत बचत होणार आहे.

हे पण वाचा :- पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! शहरात विकसित होत असलेला ‘हा’ चार मजली उड्डाणपूल ‘या’ महिन्यात बांधून तयार होणार, पहा….