आनंदाची बातमी ! आता नासिकमधून ‘या’ शहरादरम्यान सुरू होणार किमान सेवा, प्रवाशांचा प्रवास होणार सुसाट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nashik News : नासिकरांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. विशेषतः नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. वास्तविक नासिक येथील ओझर या ठिकाणी असलेल्या विमानतळावरून आता देशातील काही महत्त्वाच्या शहरांदरम्यान विमानसेवा सुरू केली जाणार आहे.

इंडिगो या एअरलाइन्स कंपनीकडून ही विमान सेवा सुरू केली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नासिक येथील ओझर विमानतळावरून आता हैदराबाद आणि इंदोर या शहरादरम्यान थेट विमान सेवा सुरू केली जाणार आहे. 

यामुळे नासिक मधून ज्या प्रवाशांना हैदराबाद आणि इंदोरला प्रवास करायचा असेल अशा प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी राहणार आहे. तसेच अहमदाबाद येथून देखील ही विमान सेवा सुरू करण्याचा मानस असल्याचे एका मीडिया रिपोर्ट मधून समोर आले आहे.

हे पण वाचा :- गणपती बाप्पा पावला…! मुंबई-गोवा महामार्गाचे ‘हे’ महत्त्वाचे काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण होणार, नितीन गडकरींनी दिलेत आदेश

केव्हा सुरू होणार ही विमानसेवा

इंडिगो कंपनीच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार, नाशिकच्या ओझर विमानतळावरून हैदराबाद आणि इंदोरला एक जून 2023 पासून विमान सेवा सुरू होणार आहे. खरं पाहता नाशिकच्या ओझर विमानतळावरून अनेक शहरादरम्यान विविध कंपन्यांनी विमान सेवा सुरू केल्या होत्या.

मात्र अनेक विमान कंपन्यांनी ओझर विमानतळावरून सुरू असलेली विमानसेवा बंद केली आहे. परंतु इंडिगो एअरलाइन्स कंपनीच्या विमानसेवेला प्रवाशांनी कायमच पसंती दर्शवली असल्याने नाशिकच्या ओझर विमानतळावरून इंडिगोच्या विमान सेवा सुरूच आहेत.

हे पण वाचा :- काय सांगता ! ‘हा’ स्टॉक एका वर्षात 31 हजार 355 रुपयांनी वाढला, गुंतवणूकदार बनलेत मालामाल; पहा या मल्टीबॅगर स्टॉकची कुंडली

शिवाय आता इंडिगो एअरलाइन्स कडून हैदराबाद आणि इंदोर या दोन शहरादरम्यान नवीन विमानसेवा सुरू केली जाणार आहे. यामुळे नासिक जिल्ह्यातील विमानाने म्हणजे हवाई मार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही एक निश्चितच आनंदाची बाब राहणार आहे.

इंडिगो एअरलाइन्स कंपनीने घेतलेला हा निर्णय निश्चितच नाशिक शहरातील प्रवाशांसाठी फायदेशीर ठरणार आहे. शिवाय यामुळे इतरही विमान कंपन्या ओझरहुन विविध शहरादरम्यान विमानसेवा सुरू करण्यास पुढे सरसावतील असे आशावादी चित्र देखील तयार होत आहे.

हे पण वाचा :- ब्रेकिंग ! 10 वी आणि 12वी चा निकाल जून महिन्यातील ‘या’ तारखेला लागणार, पहा डिटेल्स