नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! आता सिडको Navi Mumbai मध्ये निओ मेट्रो सुरु करणार, कसा राहणार रूट, पहा…..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Navi Mumbai Neo Metro : मुंबई आणि उपनगरात सध्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी खाजगी वाहनांचा वापर न करता सार्वजनिक वाहतूकीचा सर्वाधिक वापर करावा असा मानस शासन आणि प्रशासनाचा आहे.

या पार्श्वभूमीवर मुंबई आणि उपनगरात मेट्रोचे जाळे तयार केले जात आहे. सिडकोकडून देखील मुंबई आणि उपनगरात मेट्रो जाळे विकसित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

सिडको नवी मुंबई मध्ये जवळपास चार मेट्रो मार्ग प्रकल्प पूर्ण करणार आहे. यापैकी बेलापूर ते पेंधर या 11 किलोमीटरच्या मेट्रो मार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.

हे पण वाचा :- रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; रेल्वे स्टेशनवर विक्रेत्यांनी MRP पेक्षा अधिक किंमत आकारली तर ‘या’ ठिकाणी करा तक्रार, वाचा….

या मेट्रो मार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले असून आता केवळ या मार्गाचे उद्घाटन बाकी आहे. दरम्यान उर्वरित तीन मेट्रो मार्गासाठी देखील सिडकोने हालचाली तेज केल्या आहेत.

मात्र सिडको या तीन मार्गांवर टायरबेस निओ मेट्रो सुरू करणार असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर सिडकोकडून आवश्यक तयारी सुरू करण्यात आली आहे.

म्हणजेच आता सिडको नवी मुंबईमध्ये नासिक प्रमाणे स्टॅर्डड गेज मेट्रोच्या जागी मेट्रो निओ मार्ग सुरु करणार आहे. ही Neo Metro ट्रॉलीवर आधारीत असेल आणि या मेट्रोचे रुळ हे रबरचे राहणार आहे. 

हे पण वाचा :- म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करणाऱ्यांनो सावधान ! ‘ही’ काळजी घ्या नाहीतर होणार लाखों रुपयांची फसवणूक

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, बेलापूर ते पेंधर या मेट्रो मार्गानंतर आता सिडको तळोजा एमआयडीसी ते खांदेश्वर रेल्वे स्थानक, पेंधर ते तळोजा एमआयडीसी, आणि खांदेश्वर ते नवी मुंंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असे एकूण २७ किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग विकसित करणार आहे.

विशेष बाब अशी की आता याच्या अंमलबजावणीला देखील सुरुवात झाली आहे मात्र हा मार्ग स्टॅंडर्ड गेज मेट्रो प्रमाणे न उभारता नाशिकच्या निओ मेट्रोच्या धर्तीवर उभारला जाणार आहे.

निश्चितच निओ मेट्रो प्रकल्पामुळे नवी मुंबई मधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे. यामुळे प्रवाशांना जलद गतीने आपला प्रवास पूर्ण करता येणार आहे शिवाय यामुळे आरामदायी प्रवास प्रवाशांना अनुभवता येईल असा आशावाद व्यक्त होत आहे.

हे पण वाचा :- ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! ‘या’ विद्यापीठात निघाली भरती, 35 हजार रुपये पगार मिळणार, वाचा….