नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना मोठा फटका बसला. एनडीए आघाडी मधील जवळपास सर्वच घटक पक्षातील खासदारांचे संख्याबळ यंदाच्या निवडणुकीत कमी झाले आहे. विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या खासदारांच्या संख्या बळाला उतरती कळा लागली आहे. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत म्हणजे 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्वबळावर बहुमताचा म्हणजेच 272 खासदारांचा मॅजिकल आकडा गाठता आला होता.
यावेळी मात्र भारतीय जनता पक्षाला तशी ऐतिहासिक कामगिरी करता आली नाही. तथापि, बीजेपीने यावेळी आपल्या मित्र पक्षांच्या सहकार्याने बहुमत मिळवले असून तिसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापित केले आहे. दरम्यान तिसऱ्यांदा सत्ता काबीज केल्यानंतर केंद्रातील सरकार पहिल्यांदाच पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहे.
या अर्थसंकल्पात अनेक मोठमोठ्या घोषणा होणार अशी आशा आहे. यामध्ये पेट्रोल आणि डिझेल बाबतही मोठा निर्णय घेतला जाणार अशी अपेक्षा आहे. मीडिया रिपोर्ट नुसार आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेल जीएसटी च्या कक्षेत आणले जाऊ शकते. जर पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणले गेले तर यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात कपात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
निश्चितच यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. महागाईने बेजार झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात झाल्यास दिलासा मिळेल आणि त्यांचे बजेट सुधारेल अशी आशा आहे. यामुळे संपूर्ण देशाचे आज सादर होणाऱ्या बजेट कडे मोठे बारीक लक्ष आहे.
दरम्यान अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल आणि डिझेलचे सुधारित दर जाहीर केले आहेत. अशा परिस्थितीत आता आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील आजचे अर्थातच 23 जुलै 2024 चे पेट्रोल आणि डिझेलचे भाव अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचे भाव कसे आहेत ?
अहमदनगर : पेट्रोल १०४.४९ रुपये आणि डिझेल ९१.०१ रुपये प्रति लिटर
मुंबई : पेट्रोल १०३.४४ रुपये आणि डिझेल ८९.९७ रुपये प्रति लिटर
नाशिक : पेट्रोल १०४.६४ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९१.१२ रुपये प्रति लिटर
नागपूर : पेट्रोल १०३.९६ रुपये आणि डिझेल ९०.५२ रुपये
पुणे : पेट्रोल १०३.९७ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९०.३० रुपये प्रति लिटर
कोल्हापूर : पेट्रोल १०५.३६ रुपये आणि डिझेल ९१.८७ रुपये
ठाणे : पेट्रोल १०३.६९ रुपये आणि डिझेल ९०.२० रुपये प्रति लिटर