जुनी पेन्शन योजना : OPS ला नक्षलवाद्यांचे समर्थन; ‘त्या’ बॅनरमुळे पुन्हा जुनी पेन्शन मुद्दा चर्चेत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Old Pension Scheme Naksal Banner : गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात जुनी पेन्शन योजना हा एक कळीचा मुद्दा बनला आहे. निवडणुका जवळ आल्या की विरोधकांकडून हा मुद्दा उपस्थित केला जातो. अन सत्तेत आल्यानंतर पुन्हा आधी सत्तेत असलेल्या लोकांकडून या मुद्द्यावर राजकारण केलं जात. मात्र यावर केवळ राजकारण होत प्रत्यक्षात मुद्द्यावर हातच घातला जात नाही. त्यामुळे 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना वर्षानुवर्ष या मागणीसाठी झटावं लागत आहे.

दरम्यान गेल्या काही महिन्यात या मागणीसाठी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. नुकतेच 14 मार्च रोजी ओ पी एस या मागणीसाठी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून राज्यव्यापी संप आयोजित करण्यात आला होता. हा एक बेमुदत संप होता मात्र 21 मार्च 2023 रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत या विषयावर सकारात्मक चर्चा झाली.

हे पण वाचा :- महावितरणची शेतकऱ्यांसाठी मोठी ऑफर! ‘इतकं’ वीजबिल भरा आणि थकबाकी मुक्त व्हा, आधी सविस्तर माहिती वाचा

चर्चेनंतर शासनाकडून सकारात्मक आश्वासन मिळाले असल्याने संप मागे घेण्याची घोषणा 21 मार्चला कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आली. यामुळे सात दिवस चाललेल्या संपामुळे बॅकफूटवर आलेले सरकारने यामुळे सुटकेचा निश्वास घेतला. मात्र जुनी पेन्शन योजनेचा प्रश्न तसाच आहे.

आता जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजना याचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी एका समितीची स्थापना झाली असून या समितीच्या अहवालाकडे आता कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून आहे. सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार आगामी तीन महिन्यात ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे.

यामुळे आता या अहवालात नेमकं काय समोर येत, शासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान आता जुनी पेन्शन योजनेचा नक्षलवाद्यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे जवळपास एका आठवड्यापासून ज्या जुनी पेन्शन योजनेवर फारशी चर्चा होत नव्हती त्यावर पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे.

हे पण वाचा :- उन्हाळ्यात वीज बिल अधिक येत ना ! मग घराच्या छतावर बसवा सोलर पॅनल; सरकार अनुदानही देणार, ‘या’ अँप्लिकेशनवर करा अर्ज

कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्यात यावी, या मागणीसाठी काल 26 मार्च 2023 रोजी रविवारी आमगाव-सालेकसा मार्गावर सीपीआय माओवादी या नक्षल संघटनेचे बॅनर लावण्यात आले आहे. नक्षलवाद्यांनीच आता जुनी पेन्शन योजनेला पाठिंबा दिला असल्याने पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषयावर रणकंदन सुरू होणार असल्याचे चित्र आहे.

दरम्यान या सदर बॅनर मध्ये जुन्या पेन्शनला समर्थन असल्याचे नक्षलवाद्यांनी म्हटले आहे. यात नवीन पेन्शन योजना रद्द करण्यात यावी, ठेकेदारीकरण बंद करण्यात यावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. तसेच शिंदे फडणवीस सरकार विरोधात घोषणा देखील या बॅनर मध्ये आहेत. मेस्मा कायदा लागू करणारे शिंदे-फडणवीस सरकार मुर्दाबाद अशा काही घोषणा यामध्ये होत्या.

यासोबतच नक्षलवादी संघटनेच्या माध्यमातून पत्रकदेखील काढलेले आहे. या पत्रकात महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड झोनल (माओवादी) कमिटीचे प्रवक्ता अनंत असे नाव लिहिलेले होते. एकंदरीत पुन्हा एकदा जुनी पेन्शन योजना या नक्षलवादीच्या मागणीनंतर चर्चेत आली आहे.

हे पण वाचा :- ब्रेकिंग ! पुणे-मुंबई विमानसेवा सुरु, 3 तासांचा प्रवास आता एका तासात; आता टाटा समूह विमानसेवेच्या फेऱ्याही वाढवणार, पहा…