युवा शेतकऱ्याचा सेंद्रिय शेतीचा प्रयोग यशस्वी! टोमॅटो पिकातून साधली आर्थिक प्रगती, ‘अस’ केलं नियोजन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Organic Tomato Farming : अलीकडे रासायनिक खतांचा दुष्परिणाम लक्षात घेऊन शेतकरी बांधवांनी सेंद्रिय शेतीची कास धरायला सुरुवात केली आहे. या कामी शासनाकडून देखील शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात आहे. शेती क्षेत्रातील जाणकार लोक देखील आता सेंद्रिय शेतीच करायला पाहिजे असा मोलाचा सल्ला देत आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी देखील आता सेंद्रिय शेतीतून चांगली कमाई करून दाखवली आहे. पुणे जिल्हा देखील सेंद्रिय शेतीमध्ये मागे राहिलेला नाही.

जिल्ह्यातील अनेक प्रयोगशील शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीची वाट चोखंदळून लाखो रुपयांची कमाई करत सर्वांना एक नवीन मार्ग दाखवण्याचे काम केले आहे. ऑरगॅनिक फार्मिंगचा असाच एक नवखा प्रयोग जिल्ह्यातील भोर तालुक्याच्या कान्हवडी येथील एका युवा शेतकऱ्याने केला आहे. अक्षय किसन भोसले या तरुणाने पारंपारिक पीक पद्धती ऐवजी टोमॅटो या भाजीपाला वर्गीय पिकाची शेती सेंद्रिय पद्धतीने करत चांगले विक्रमी आणि दर्जेदार उत्पादन मिळवून दाखवले आहे.

हे पण वाचा :-सावधान ! अवकाळीच संकट अजून गेलं नाही; नाशिक, अहमदनगर, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीत ‘इतके’ दिवस पाऊस पडणार

खरं पाहता सेंद्रिय शेतीमुळे जमिनीची सुपीकता अबाधित राखण्यास मदत होते. त्यामुळे प्रदूषण नियंत्रणात राहते तसेच रासायनिक खतांवर होणारा हजारो रुपयांचा उत्पादन खर्च वाचतो. सोबतच मानवी आरोग्य देखील सेंद्रिय शेतीमुळे सदृढ ठेवण्यास मदत होत आहे. याच सगळ्या पार्श्वभूमीवर अक्षय यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. भोर तालुका म्हटलं की सर्वप्रथम डोळ्यापुढे उभे राहत होते भात पिकाच चित्र. भात उत्पादनासाठी संपूर्ण राज्यात भोर तालुक्याने आपला दबदबा बनवला आहे.

पण आता भाताच्या आगारात भात पीक परवडणारे राहिलेलं नाही. अधिकचे पाणी, अधिकची मेहनत, अधिकचा उत्पादन खर्च आणि पदरी पडणार कवडीमोल उत्पादन त्यामुळे आता शेतकऱ्यांनी पर्यायी पिकाची शोधा-शोध सुरू केली आहे. अक्षय यांनी देखील भात पिकाला पर्यायी पीक म्हणून टोमॅटो पिकाची सेंद्रिय पद्धतीने शेती सुरू केली आहे. त्यांनी आपल्या शेतीत टोमॅटोची 6 हजार रोपे लावली आहेत. टोमॅटोची लागवड झाल्यानंतर पीक चांगले वाढावे म्हणून एक पाणी दिलं की त्यानंतर लगेच जीवामृत पिकाला लावण्यात आले आहे.

हे पण वाचा :- ब्रेकिंग! राज्य कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक; संपात सामील झालेल्या ‘त्या’ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश निर्गमित

अक्षय यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोनशे लिटर पाण्यात दहा किलो शेण, दहा लिटर गोमूत्र, तीन किलो गूळ, दोन किलो बेसन पीठ, कडुलिंबाचा पाला दहा किलो ही सर्व सामग्री घेऊन त्यांनी जीवामृत तयार केले आहे. ही सामग्री एकत्रितरित्या घेऊन आठ दिवस ते मिश्रण तसंच ठेवलं जातं आणि त्यानंतर जीवामृत तयार होतं आणि हे जीवामृत पिकासाठी वापरलं जातं. जीवामृत वापरामुळे पीक चांगले आले असल्याचा दावा त्यांनी केला आहे. जीवामृत वापरण्यापूर्वी मात्र ते मिश्रण गाळून घेतले जाते आणि मगच पिकाला दिले जाते.

यासोबतच अमृतपाणी आणि गाईच्या शेणापासून तयार झालेले जिवाणू संवर्धन यांचा देखील वापर त्यांनी केला आहे. या सेंद्रिय खतांचा त्यांनी वापर केला यामुळे पीक चांगले वाढले. ते सांगतात की, पीक लागवडीनंतर तब्बल एका महिन्याने त्यांनी पिकासाठी सपोर्टची व्यवस्था केली. बांबू आणि तारेच्या साह्याने त्यांनी पिकाला आधार दिला. साधारण एक महिन्यानंतर टोमॅटो पिकाला फुलधारणा झाली अन त्यानंतर फळधारणा होण्यास सुरुवात झाली. साधारणपणे लागवडीनंतर दोन ते सव्वा दोन महिन्यानंतर पिकातून त्यांना उत्पादन मिळू लागले.

हे पण वाचा :- सातारा, सांगली, कोल्हापूरहुन मुंबईला प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! आता ‘हे’ दोन दिवस बंद राहणार ‘हा’ मार्ग

सेंद्रिय पद्धतीने पीक उत्पादित झाले असल्याने बाजारात मालाला चांगली मागणी आहे. ते आपल्या जवळच्याच बाजारात या मालाची विक्री करत असून तीनशे रुपये प्रति कॅरेट असा भाव त्यांना मिळत आहे. सध्या दोन दिवसाआड त्यांना यापासून उत्पादन मिळत आहे. साधारण 25 ते 30 कॅरेट माल दोन दिवसांनी त्यांना मिळत आहे. यामुळे जर हवामानात अमलाग्र असा बदल झाला नाही तर त्यांना या पिकातून चांगली कमाई होण्याची आशा त्यांना आहे. जवळपास चार महिन्यापर्यंत हा हंगाम चालेल असं त्यांनी सांगितलं आहे.

निश्चितच एकीकडे रासायनिक खतांचा भरमसाठ वापर करूनही शेतकऱ्यांना शेतीमधून अपेक्षित असे उत्पन्न मिळत नसताना या युवा शेतकऱ्याने सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून चांगले विक्रमी आणि दर्जेदार उत्पादन मिळवत लाखो रुपयांच्या कमाईचा मार्ग शोधला आहे. यामुळे सध्या युवा शेतकरी अक्षय भोसले यांची पंचक्रोशीत चर्चा पहावयास मिळत आहे. एकंदरीत अक्षय यांच शेती मधलं हे यश इतर प्रयोगशील आणि युवा शेतकऱ्यांना शेती कसण्यासाठी प्रेरित करेल यात तीळमात्र देखील शंका नाही.

हे पण वाचा :- महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के तिकीट सवलत लागू; पण ‘या’ महिलांना मिळणार नाही याचा लाभ, वाचा याविषयी सविस्तर