पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज ! ‘या’ भागात पावसाची शक्यता, तुमच्याकडे कसे राहणार हवामान? वाचा…

Tejas B Shelar
Published:
Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj : जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. खरंतर गत काही दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामान कोरडे आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात कुठेच पावसाची नोंद करण्यात आलेली नाही. मान्सून परतल्यानंतर काही दिवस महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला होता. अनेक ठिकाणी तर ढगफुटी सारखा पाऊस झाला.

त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले पीक या मानसूनोत्तर पावसामुळे वाया गेले. हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला.

अशातच आता पंजाबरावांचा एक नवीन अंदाज समोर आला आहे. आता दिवाळी उलटून बरेच दिवस झालेत. यामुळे राज्यात कडाक्याची थंडी पडणे अपेक्षित आहे.

मात्र अजूनही राज्यातील काही भागांमध्ये कडाक्याची थंडी पडत नाहीये. थंडीचे प्रमाण राज्यात फारच कमी असून यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. दरम्यान पंजाब रावांनी आता महाराष्ट्रात हळूहळू थंडी वाढत जाणार असे म्हटले आहे.

महाराष्ट्रात आता पाऊस काही होणार नाही. राज्यातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहील आणि थंडीची तीव्रता वाढेल. राज्यातील पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र,

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागात हवामान प्रामुख्याने कोरडे राहील आणि या भागांमध्ये थंडीची तीव्रता वाढेल असा अंदाज पंजाबरावांनी नुकताच जारी केला आहे.

सध्याचे हवामान हे रब्बी हंगामातील पिकांसाठी आणि रब्बी हंगामातील पीक पेरणीसाठी खूपच पोषक असून ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या बाकी असतील त्यांनी लवकरात लवकर पेरणीची कामे करून घ्यावीत असा सल्ला देण्यात आला आहे.

पण, महाराष्ट्रात 13 ते 14 नोव्हेंबर दरम्यान ढगाळ हवामानाची शक्यता आहे. या काळात राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये ढगाळ हवामान राहील असे पंजाब रावांनी आपल्या नवीन अंदाजात म्हटले आहे.

मात्र या काळात राज्यात कुठेच पाऊस पडणार नाही यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करू नये. मात्र तामिळनाडू आणि केरळ या दोन राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तामिळनाडू आणि केरळ मध्ये मुसळधार पाऊस होणार असा अंदाज पंजाब रावांनी दिला आहे. आपल्या महाराष्ट्रात मात्र कुठेच पाऊस पडणार नाही यामुळे शेतकऱ्यांनी काहीही काळजी करू नये आपली शेतीची कामे योग्य पद्धतीने करावीत असा सल्ला यावेळी देण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe