मोठी बातमी ! पंजाबरावांचा फेब्रुवारी महिन्यातील सुधारित हवामान अंदाज ; अहमदनगरसह संपूर्ण महाराष्ट्रात असं राहणार हवामान, पहा काय म्हटले डख

Panjabrao Dakh News : परभणीचे हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी आपला नवीन हवामान अंदाज सार्वजनिक केला आहे. गेल्या महिन्यात पंजाब रावांचा पावसाबाबतचा आपला अंदाज तंतोतंत खरा ठरला होता. अशा परिस्थितीत आता फेब्रुवारी महिन्यातील आपल्या हवामान अंदाजात पंजाबराव डख यांनी काय म्हटले आहे याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यामुळे आज आपण पंजाबरावांचा फेब्रुवारीमधला हवामान अंदाज सविस्तर जाणून घेणार आहोत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

डखं यांनी वर्तवलेल्या आपल्या नवीन अंदाजानुसार फेब्रुवारी महिन्यात आज 1 फेब्रुवारी रोजी राज्यातील काही जिल्ह्यात ढगाळ हवामान राहणार आहे. आज राज्यातील तुरळक ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस कोसळू शकतो. परंतु फार मोठा पाऊस कोणत्याचं जिल्ह्यात आणि कोणत्याच गावात होणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच उद्यापासून राज्यात प्रामुख्याने कोरडे हवामान राहणार आहे. परंतु अहमदनगर सह राज्यातील काही जिल्ह्यात उद्या वातावरणात दाट धुके राहणार आहे.

यामुळे शेतकरी बांधवांना आपल्या पिकांची काळजी या ठिकाणी घ्यावी लागणार आहे. दाट धुक्याची चादर वातावरणात राहणार असल्याने याचा रब्बी हंगामासह कांदा या नगदी पिकावर देखील विपरीत परिणाम होण्याची शक्यता त्यांच्याकडून वर्तवण्यात आली आहे. या दाट धुक्यामुळे द्राक्ष पिकाला देखील फटका बसू शकतो. साहजिकच पंजाबरावांचा हा अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी तज्ञ लोकांच्या सल्याने पिकासाठी योग्य त्या कीटकनाशकांची तसेच बुरशीनाशकांची फवारणी करायची आहे.

Advertisement

शिवाय पंजाब रावांनी 22 फेब्रुवारी पर्यंत थँडीचा जोर कायम राहणार असल्याचे सांगितले आहे. विशेषतः 10 फेब्रुवारी पर्यंत कडाक्याची थंडी राहणार आहे. मात्र असे असले तरी 22 फेब्रुवारी पर्यंत यावर्षी थंडी कायम राहील आणि 23 फेब्रुवारीपासून ऊन चटकायला सुरुवात होणार आहे. म्हणजेच 23 फेब्रुवारीपासून उन्हाचे चटके बसायला सुरुवात होईल आणि थंडीचा हंगाम संपुष्टात येईल असं त्यांनी स्पष्ट केल आहे.