Panjabrao Dakh News : राज्यात ऑक्टोबर महिन्याची सुरुवात कडक सूर्यदर्शनाने झाली. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर ओसरला असून आता राज्यावर सूर्यदेवता कोपले आहेत. उन्हाचा ताप वाढला असल्याने उकाड्यात सुद्धा वाढ झाली आहे.
अवघ्या दोन दिवसातच वाढत्या उकाड्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. एकीकडे ऑक्टोबर हिट ची तीव्रता वाढत आहे तर दुसरीकडे पंजाब रावांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा परतीचा पाऊस सक्रिय होणार असल्याचे म्हटले आहे.
पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजपासून पुढील तीन दिवस म्हणजेच 5 ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे. या काळात दिवसाच्या कमाल तापमानात वाढ होईल परिणामी उकाडा अधिक जाणवणार अशी शक्यता आहे.
मात्र तदनंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. अर्थातच सहा ऑक्टोबर पासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात पाऊस सक्रिय होणार असे पंजाबरावांचे म्हणणे आहे.
डख यांनी सांगितल्याप्रमाणे 6 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर या चार दिवसाच्या काळात राज्यातील बहुतांशी भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान 10 ऑक्टोबर नंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी होणार आहे.
10 ऑक्टोबर पासून जवळपास 22 ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रात कुठेच पाऊस पडणार नाही असे दिसत आहे. परंतु 23 ऑक्टोबर नंतर पुन्हा एकदा राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे.
23 ऑक्टोबर पासून ते 25 ऑक्टोबर दरम्यानच्या तीन दिवसांच्या काळात राज्यात जोरदार पावसाची शक्यता पंजाबरावांच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे. एवढेच नाही तर यंदा पाच नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात थंडी पडणार असा अंदाज पंजाब रावांनी जारी केला आहे.