शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी आता ‘इतकं’ मिळणार अनुदान; पहा पात्रता अन अर्ज करण्याची प्रोसेस

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm Kisan Tractor Yojana Maharashtra : महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना मजूर टंचाईचा सामना करावा लागत आहे. यामुळे शेती करणं अलीकडे जिकिरीचे बनले आहे. अशा परिस्थितीत आता शेतकऱ्यांनी शेतीत अगदी मशागतीपासून ते काढणीपर्यंत यांत्रिकीकरणावर जोर दिला आहे.

यामध्ये प्रामुख्याने ट्रॅक्टरचा उपयोग गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ट्रॅक्टरचा वापर पूर्व मशागतीपासून ते हार्वेस्टिंग पर्यंतच्या सर्वच कामात केला जातो. ट्रॅक्टर मुळे शेतकऱ्यांना निश्चितच शेती करताना मोठा हातभार लागत आहे. मात्र ट्रॅक्टर खरेदी करणे हे देखील सोपे नाही.

हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी खुशखबर ! विरार-अलिबाग कॉरिडोरबाबत झाला ‘हा’ मोठा निर्णय; आता ‘या’ महिन्यात सुरु होणार काम, पहा….

अल्पभूधारक आणि गरीब शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी आवश्यक पैसा उपलब्ध करण्यात मोठ्या अडचणी निर्माण होतात. अशा परिस्थितीत, शासनाकडून यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जात आहेत. या योजनेच्या माध्यमातून ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान देखील मिळते.

पीएम किसान ट्रॅक्टर योजनेच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान मिळत आहे. म्हणून आज आपण पीएम किसान ट्रॅक्टर योजनेसाठी आवश्यक पात्रता, या योजनेअंतर्गत किती अनुदान मिळतं आणि यासाठी अर्ज कसा करायचा याबाबत सविस्तर अशी माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! आता ‘या’ शहरादरम्यान सुरू झाली स्पेशल सुपरफास्ट ट्रेन; पहा कसं आहे वेळापत्रक? कुठं आहेत थांबे?

पीएम किसान ट्रॅक्टर योजनेअंतर्गत मिळणार अनुदान?

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान देण्याचे प्रावधान आहे. शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून ट्रॅक्टरच्या किमतीवर 20 टक्के अनुदान मिळत असतं. निश्चितच यामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध होतं आणि याचा त्यांना फायदा होत आहे.

पीएम किसान ट्रॅक्टर योजनेसाठी आवश्यक पात्रता

या योजनेचा लाभ केवळ शेतकऱ्यांना मिळतो. म्हणजेच शेती योग्य जमिनी असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान मिळते.

तसेच ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी कोणताच ट्रॅक्टर खरेदी केलेला नाही अशाच शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत अनुदान मिळतं.

या योजनेचा लाभ हा केवळ एकच ट्रॅक्टर खरेदीवर मिळतो आणि लाभ हा एकदाच मिळतो.

एका कुटुंबातील एकाच सदस्याला या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.

हे पण वाचा :- पंजाबराव डख म्हणताय की उद्यापासून आणखी ‘इतके’ दिवस पाऊस पडणार ! कोणत्या जिल्ह्यात पडणार पाऊस? पहा…

योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

इतर अन्य शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी जी कागदपत्रे आवश्यक असतात तीच कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यासाठी देखील आवश्यक आहेत. यामध्ये अर्जदार शेतकऱ्याचे आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवाशी दाखला, उत्पन्नाचा दाखला, पॅन कार्ड, बँक पासबुक, ड्रायव्हींग लायसन्स (गाडी चालविण्याचा परवाना), सातबारा, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट साईज फोटो इत्यादि कागदपत्रांची पूर्तता शेतकऱ्यांना करावी लागणार आहे.

ऑनलाइन अर्ज कुठे करायचा?

या योजनेसाठी सीएससी केंद्रावर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. मात्र 2023 मध्ये याच्या अंमलबजावणी बाबत सरकारकडून अधिकारीक माहिती देण्यात आलेली नाही. मात्र या योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर सीएससी केंद्रावर अर्ज शेतकऱ्यांना सादर करता येऊ शकतो असे सांगितले जात आहे.

हे पण वाचा :- खुशखबर! सरकारी नोकरभरतीत आता नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र लागणार नाही; सरकारने घेतला मोठा निर्णय