पुणे, अहमदनगरकरांना मिळणार गोड बातमी ! पुणे-अहमदनगर रेल्वे सुरु होणार, रेल्वे बोर्डाच्या सदस्याने दिली माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune-Ahmednagar Railway : पुणे अन अहमदनगरकरांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. आता लवकरच पुणे-अहमदनगर प्रवास आणखी जलद होणार असल्याचे चित्र आहे. अहमदनगर राज्यातील सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा आणि पुणे राज्याची सांस्कृतिक राजधानी तसेच देशातील प्रमुख शैक्षणिक केंद्र अशा परिस्थितीत या दोन्ही शहरां दरम्यान रोजाना हजारो प्रवासी प्रवास करतात.

कामानिमित्त, शिक्षणानिमित्त, व्यवसायानिमित्त या दोन्ही शहरादरम्यान कायमच वर्दळ पाहायला मिळते. यामुळे प्रवाशांकडून या दोन्ही शहरांदरम्यानची कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून रेल्वेची मागणी केली जात आहे. दरम्यान आता याबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे.

प्रवाशांच्या या मागणीवर सकारात्मक निर्णय घेतला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अखिल भारतीय रेल्वे प्रवाशी सेवा सुविधा समितीचे सदस्य डॉ. राजेंद्र फडके यांनी या मागणीवर सकारात्मक निर्णय घेऊ आणि केंद्रीय रेल्वे समितीच्या बैठकीत हा विषय मांडू अस आश्वासन दिल आहे.

हे पण वाचा :- सातारा, पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; 1 एप्रिलपासून पुणे-सातारा महामार्गावरील प्रवास महागणार, ‘या’मुळे बसणार खिशाला कात्री

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, केंद्रीय रेल्वे समितीची बैठक एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे येत्या काही दिवसात पार पडणार आहे. अशा परिस्थितीत या बैठकीत हा विषय मांडण्याचे आश्वासन फडके यांनी दिले असल्याने पुणे ते अहमदनगर दरम्यान लवकरच रेल्वे सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

फडके यांनी अहमदनगर रेल्वे स्थानकाचा नुकताच दौरा केला यावेळी त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. यावेळी फडके यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, पुणे-अहमदनगर या रेल्वे गाडीची मागणी प्रवाशांकडून केली गेली आहे.

तसेच लखनऊ, दरभंगा या भागात जाणाऱ्या, पुण्यावरून सुटणाऱ्या गाड्यांना अहमदनगरमध्ये थांबा द्यावा अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. या परिस्थितीत प्रवाशांच्या या मागणीबाबत सकारात्मक विचार केला जाईल असं त्यांनी यावेळी आश्वासन दिलं.

हे पण वाचा :- नांदेडच्या शेतकऱ्याचा नादखुळा ! कोरडवाहू जमिनीवर सुरू केली पेरूची शेती; एकरी 120 टन उत्पादनाची साधली किमया, बनला लखपती

तसेच 10 एप्रिलला केंद्रीय रेल्वे समितीची बैठक होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच या बैठकीत प्रवाशांकडून उपस्थित करण्यात आलेली मागणी आणि अन्य काही विषय मांडले जातील असं देखील त्यांनी सांगितलं. एवढेच नाही तर या मागणीवर नक्कीच सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा डॉ.फडके यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

वास्तविक प्रवाशांची ही मागणी गेल्या अनेक दिवसांपासूनची आहे यामुळे या मागणीवर खरंच सकारात्मक निर्णय घेतला जातो का याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. मात्र रेल्वे अधिकाऱ्यांनी याबाबतची कोणतीच मागणी किंवा प्रस्ताव आमच्याकडे आला नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे पुणे ते अहमदनगर दरम्यान खरंच रेल्वे सुरू होते का? प्रवाशांना दिलासा देण्याचे काम भारतीय रेल्वे बोर्डाकडून होते का? याकडे आता सर्वांचेच विशेष लक्ष राहणार आहे. 

हे पण वाचा :- सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! ‘या’ विभागात शिपाई पदासाठी निघाली मोठी भरती; पगार मिळणार तब्बल 81 हजार, पहा कसा…