मोठी बातमी ! पुणे-अहमदनगर-औरंगाबाद महामार्गासाठी पुणे जिल्ह्यात भूसंपादन सुरु, अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यात….

Pune Aurangabad Expressway : पुणे अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यासाठी महत्त्वाचा महामार्ग म्हणजेच पुणे औरंगाबाद महामार्गाबाबत आताची सर्वात मोठी माहिती समोर आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

हा सदर महामार्ग या तीन जिल्ह्यांसाठी नव्हे-नव्हे तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. महामार्गामुळे मराठवाड्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील कनेक्टिव्हिटी अधिक सुलभ होणार आहे. शिवाय कृषी क्षेत्राला, उद्योग जगताला आणि पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. निश्चितच यामुळे महाराष्ट्राच्या विकासाला दृतगती लाभणार आहे.

आता या महामार्गाच्या निर्मितीसाठी हालचालींना वेग आला आहे. भूसंपादनाची कामे जोमात सुरू झाली आहेत. पुणे जिल्ह्यातील भूसंपादन प्रक्रिया राबवण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी भूसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्ती देखील केली आहे. यामुळे निश्चितच पुणे जिल्ह्यात भूसंपादनाच्या कामाला गती मिळाली असून महामार्गामध्ये आपली जमीन जाणाऱ्या जमीनदाराला देखील महामार्गाचा रोड मॅप समजणार आहे.

Advertisement

दरम्यान अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यात भूसंपादनासाठी अजून काही काळ वाट पहावी लागणार आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, भूसंपादन अधिकारी नियुक्त करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून एक अधिसूचना काढून भूसंपादनाची प्रक्रिया साठी आदेशित केले जाते.

मात्र पुणे जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी कोणत्याच अधिसूचनेची किंवा नोटिफिकेशन ची वाट न पाहता सरळ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला भूसंपादन अधिकारी नियुक्त करण्यासाठी ची अनुमती मागितली. मीडिया रिपोर्टनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी मागितलेली अनुमती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मान्य केली असून पुणे जिल्ह्यातील भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

याबाबत औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूसंपादन अधिकारी नियुक्त करण्याबाबत अजून नोटिफिकेशन निघालेली नाही. नोटिफिकेशन निघाल्यानंतर भूसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्ती होणार आहे. भूसंपादनाची जबाबदारी असलेले उपजिल्हाधिकारी प्रबोदय मुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिसूचना निघाल्यानंतर संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांची भूसंपादन अधिकारी म्हणून नियुक्ती केली जाणार आहे.

Advertisement

दरम्यान अहमदनगर जिल्ह्याबाबतही औरंगाबाद जिल्ह्यासारखीच परिस्थिती आहे. भूसंपादनासाठी आवश्यक अधिसूचना अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांकडे आलेले नाही. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील भूसंपादनाचे कामदेखील रखडलेले असल्याचे चित्र आहे. मात्र एका मीडिया रिपोर्ट मध्ये केलेल्या दाव्यानुसार येत्या पंधरा दिवसात भूसंपादनासाठी आवश्यक अधिसूचना जारी होणार आहे.

निश्चितच अधिसूचना जारी झाल्यानंतर भूसंपादनाच्या कामाला गती मिळणार आहे. अधिसूचनेनंतर भूसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्ती आणि त्यानंतर भूसंपादन प्रक्रिया प्रत्यक्षात राबवली जाणार आहे. यामुळे भूसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्यानंतर महामार्गामध्ये जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांची नावे, गट नंबर प्रसिद्ध होणार आहेत.

निश्चितच या महामार्गामध्ये पुणे जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वप्रथम भूसंपादन अधिकारी नियुक्ती करून भूसंपादनाच्या कामाला गती दिली आहे. येत्या काही दिवसात अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातही संपादन सुरू होणार असून तूर्तास जमीनदारांना वाट पाहावी लागणार आहे. 

Advertisement