पुणेकरांसाठी सोने पे सुहागा ! ‘या’ मेट्रो मार्गातील सर्वात मोठा अडसर दूर, आता 40 महिन्यांच्या आत पूर्ण होणार मेट्रो मार्गाचे काम

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Metro Latest News : पुणे शहर म्हणजेच शिक्षणाचे माहेरघर आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी. या शहराला मोठ ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व प्राप्त आहे. विशेष बाब म्हणजे अलीकडील काही वर्षात पुणे शहर हे आयटी हब म्हणून वेगाने डेव्हलप होऊ पाहत आहे. अशा परिस्थितीत शहरात लोकसंख्या आणि वाहनांची संख्या वेगाने वाढत आहे.

यामुळे शहरात वाहतूक कोंडी आणि प्रदूषण झपाट्याने पाय पसरवू लागले आहे. म्हणून वाहतूक कोंडीवर आणि प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लोकांनी खाजगी वाहनांचा वापर न करता सार्वजनिक वाहनांचा वापर करावा यासाठी शासनाच्या माध्यमातून तसेच प्रशासनाच्या माध्यमातून जोमात प्रयत्न सुरू आहेत.

हे पण वाचा :- गुंतवणूकदारांसाठी ‘हा’ स्टॉक ठरला कुबेर का खजाना ! फक्त 6 महिन्यात 2 लाखाचे बनवलेत 30 लाख, पहा….

याच प्रयत्नाचा भाग म्हणून पुणे शहरात वेगाने मेट्रो मार्गांचे जाळे विकसित केले जात आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान देखील मेट्रो मार्ग विकसित होत आहे. या मेट्रो लाईन तीन संदर्भात आता एक मोठी माहिती हाती आली आहे. वास्तविक, या मार्गातील शिवाजीनगर मेट्रोस्थानकासाठी जिल्हा व सत्र न्यायालयाची जागा हवी होती.

यासाठी पीएमआरडीएच्या माध्यमातून गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून न्यायालयाकडे पाठपुरावा सुरू होता. दरम्यान आता ही जागा न्यायालयाने मेट्रो स्थानकासाठी देऊ केली आहे. बुधवारी न्यायालयाने याबाबत लेखी परवानगी दिली आहे. त्यामुळे हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान विकसित होत असलेला मेट्रोमार्ग लवकरच मूर्त रूप घेईल आणि यामुळे पुणेकरांना दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे.

हे पण वाचा :- कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! मुख्यमंत्री शिंदे घेणार मोठा निर्णय; ‘या’ दिवशी महागाई भत्त्यात होणार 4% वाढ, तारीख झाली फिक्स, पहा….

कसा आहे हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्ग

पुणे मेट्रो लाईन तीन अर्थातच हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्ग पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडच्या माध्यमातून पूर्ण केला जात आहे. हा प्रकल्प खाजगी विकासकांच्या माध्यमातून पीपीपी तत्त्वावर विकसित केला जात आहे. परंतु मेट्रो मार्गासाठी आवश्यक जागेची भूसंपादन करण्याची जबाबदारी ही पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची राहणार आहे.

दरम्यान या पुणे आयटीसीटी मेट्रो रेल लिमिटेड कंपनीला हा प्रकल्प 40 महिन्यात पूर्ण करायचा आहे. या पार्श्वभूमीवर या कंपनीने कामाला जोमात सुरुवात केली असून बहुतांशी काम पूर्ण देखील झाले आहे. परंतु शिवाजीनगर मेट्रो स्थानक उभारण्यासाठी आवश्यक जागा न्यायालयाच्या आवारातील असल्याने या जागेमुळे हा मार्ग उभारणीसाठी विलंब होऊ शकतो असे चित्र तयार होत होते. मात्र आता न्यायालयाने ही जागा पीएमआरडीए कडे हस्तांतरित करण्यास लेखी परवानगी दिली असल्याने या मेट्रो मार्गाचे काम जलद गतीने पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे पण वाचा :- कौतुकास्पद ! पती निधनानंतर खचून न जाता शेती सांभाळली; सफरचंदाच्या लागवडीतून झाली लाखोंची कमाई, पहा….