पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! शहरात विकसित होत असलेला ‘हा’ चार मजली उड्डाणपूल ‘या’ महिन्यात बांधून तयार होणार, पहा…..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune News : पुणे शिक्षणाचे माहेरघर आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी सोबतच Pune आता आयटी हब म्हणून संपूर्ण जगात विख्यात होत आहे. पुणे शहरात दिवसेंदिवस लोकसंख्याही वाढत आहे आणि वाहनांची संख्या देखील वेगाने वाढली आहे. साहजिकच यामुळे शहरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या तीव्र रूप घेत आहे. यामुळे पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरात वेगवेगळी विकासाचे कामे केली जात आहेत.

पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठातील चौकात देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. गणेशखिंड रस्त्यावर असलेल्या या चौकात शहरातील सर्व मुख्य रस्ते येऊन भेटतात. यामुळे या चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे जाणकार लोकांनी नमूद केले आहे. हिंजवडी, बाणेर, बालेवाडी, मावळ आणि पिंपरी चिंचवडच्या काही परिसरात आणि IT हब दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी गणेशखिंड रस्ता हा मुख्य मार्ग आहे.

हे पण वाचा :- 12वी पास अन Typing कोर्स केलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ! ‘या’ विद्यापीठात मोठी भरती सुरू, पहा….

म्हणजेच या मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर प्रवाशांकडून होतो. यामुळे विद्यापीठ चौकात कायमच गर्दी होते. यावर रामबाण उपाय म्हणून पुणे महापालिकेकडून पीएमआरडीएच्या माध्यमातून चार मजली उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. या उड्डाणपुलाचे काम झाल्यानंतर या भागातील वाहतूक कोंडी मात्र कायमची दूर होणार आहे. या प्रकल्पा अंतर्गत फ्लायओवर विकसित केला जाणार आहे आणि त्यावर मेट्रो चालवण्याचे नियोजन आखण्यात आले आहे.

निश्चितच या चार मजली उड्डाणपुलामुळे पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. सध्या या प्रकल्पाचे काम जोमात सुरू आहे. वास्तविक, या पुलाचे काम गेले काही दिवस रखडले होते. मात्र आता पुन्हा एकदा याचे काम सुरू झाले आहे. सध्या काम युद्ध पातळीवर सुरू असून कामामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीचा फटका बसतच आहे.

हे पण वाचा :- पंजाबराव डख हवामान अंदाज; हवामानात अचानक झाला मोठा बदल, 21 एप्रिलपासून पुन्हा ‘या’ जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडणार ! पहा….

यामुळे हे काम जलद गतीने पूर्ण व्हावे आणि लवकरात लवकर हा पूल वाहतुकीसाठी खुला व्हावा अशी पुणेकरांची इच्छा आहे. दरम्यान हा पूल 2024 पर्यंत पूर्ण केला जावा अशी मागणी आमदार शिरोळे यांनी यावेळी उपस्थित केली आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाशी संबंधित अधिकाऱ्यांच्या माध्यमातून नोव्हेंबर 2024 पर्यंत यापुलाचे काम होऊ शकते मात्र यासाठी लवकरात लवकर आवश्यक परवानगी मिळणे अपेक्षित आहे, असे सांगितले जात आहे.

अशा परिस्थितीत हा चार मजली उड्डाणपूल नोव्हेंबर 2024 पर्यंत जर सर्व कामे व्यवस्थित झाली तर तयार होऊ शकतो असं चित्र तयार होत आहे. निश्चितच पुढल्या वर्षी डिसेंबरपर्यंत या पुलाचे काम होईल आणि पुणेकरांची गणेशखिंड रस्त्यावर विशेषतः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या चौकात होणारी वाहतूक कोंडीतुन कायमची सुटका होईल असा आशावाद आता व्यक्त करण्यास काही हरकत नाही.

हे पण वाचा :- 10वी पास उमेदवारांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ सरकारी विभागात निघाली मोठी भरती, पगार मिळणार तब्बल 32 हजार, पहा….