पुणे रिंगरोडच्या भूसंपादनाला आला वेग ! ‘त्या’ 47 हेक्टर जागेसाठी प्रस्ताव सादर, वाचा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Ring Road : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पीएमआरडीएच्या माध्यमातून आणि राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. पीएमआरडीएकडून शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रिंगरोडचे काम खाते घेण्यात आले आहे.

सोबतच राज्य रस्ते विकास महामंडळाने देखील पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रिंग रोडचे काम हाती घेतले आहे. दरम्यान, पीएमआरडीएने हाती घेतलेल्या रिंग रोड संदर्भात एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थातच पीएमआरडीएने हाती घेतलेल्या रिंग रोडच्या भूसंपादनाला आता गती देण्यात आली आहे. खरंतर पुणे रिंग रोड 88 किलोमीटर लांबीचा आणि 66 मीटर रुंदीचा आहे. यासाठी मात्र पीएमआरडीला वन विभागाची 47 हेक्टर जमीन लागणार आहे.

दरम्यान आता पीएमआरडीएने वन विभागाला ही जमीन हस्तांतरित करण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. याबाबत उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, वन विभागाची 47 हेक्टर जमीन मिळावी यासाठी विभागाला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

विशेष बाब म्हणजे या जमिनीच्या मोबदल्यात वन विभागाला जिल्ह्यात इतरत्र तितकीच जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. वनेतर क्षेत्र देण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयास विनंती करण्यात आली असल्याचे त्यांनी नमूद केले असून पर्यायी जागेचा तपशील उपलब्ध झाल्यास वनविभागाची चर्चा करून पर्यायी जागा देण्यात येईल, अशी माहिती यावेळी जगताप यांनी दिली आहे.

सविस्तर प्रकल्प अहवाल लवकरच होणार तयार 

या प्रकल्पाबाबत महत्त्वाचे अपडेट देताना उपजिल्हाधिकारी जगताप यांनी सांगितले की, 88 किलोमीटर लांबीचा आणि 66 मीटर रुंदीचा रिंग रोड प्रकल्पासाठी सध्या सविस्तर प्रकल्प अहवाल अर्थातच डीपीआर तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

यासाठी सल्लागारामार्फत काम युद्ध पातळीवर सुरू असून भूसंपादनाचा प्रस्ताव देखील सल्लागारामार्फत तयार करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तसेच पहिल्या टप्प्यासाठी सोलू, निरगुडी व वडगांव शिंदे या तीन गावांचे भूसंपादन प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

शिवाय आता वन विभागाच्या जमिनीसाठी देखील प्रयत्न सुरू झाले आहेत. एकंदरीत या रिंग रोड साठी आवश्यक भूसंपादनाला चांगलीच गती मिळाली असल्याचे पहावयास मिळत आहे.

प्रकल्पाबाबत थोडक्यात

रिंग रोडची लांबी :- 88 किलोमीटर

रिंग रोड ची रुंदी :- 66 मीटर

रिंग रोडसाठी सुधारित खर्च :- 14,200 कोटी रुपये