पंजाबरावांचा हवामान अंदाज; आजपासून ‘या’ भागात पडणार अवकाळी पाऊस !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Punjabrao Dakh Havaman Andaj : राज्यात गेल्या महिन्यापासून अवकाळी पावसाने चांगलंच थैमान माजवायला सुरुवात केली आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. रब्बी हंगामातील काढणी योग्य पिकांचे, कांदा पिकाचे अन फळबाग वर्गीय पिकांचे सध्या कोसळत असलेल्या पावसामुळे नुकसान होत आहे.

अशातच शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडणार आहे तर काही भागात ढगाळ हवामान कायम राहणार आहे. आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण राज्यात लोकप्रिय बनलेल्या पंजाबरावांनी राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता असल्याचा अंदाज बांधला आहे.

हे पण वाचा :- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! शिंदे सरकारने कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय; पहा….

वास्तविक पंजाब रावांनी मागील महिन्यात आणि या महिन्याच्या सुरुवातीला वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडला आहे. एकंदरीत डख यांचा हवामान अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे. अशा परिस्थितीत डख यांनी पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केला असल्याने शेतकऱ्यांच्या काळजाची धडधड वाढली आहे. दरम्यान आज आपण पंजाबरावांनी नेमक्या कोणत्या कालावधीत आणि कुठे पाऊस पडेल या बाबत काय माहिती दिली आहे याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज ! आणखी ‘इतके’ दिवस कोसळणार अवकाळी; ‘या’ तारखेला थांबणार पावसाचं थैमान, पहा काय म्हटले डख

कुठं पडणार पाऊस?

पंजाब रावांनी वर्तवलेल्या आपल्या नवीन हवामान अंदाजानुसार आज पासून अर्थातच १४ एप्रिल 2024 पासून राज्यात पुन्हा एकदा पाऊस पडणार आहे. 14 एप्रिल ते 16 एप्रिल दरम्यान राज्यात अवकाळी पाऊस पडणार आहे. या कालावधीमध्ये पडणारा पाऊस मात्र सर्वदूर राहणार नाही तर तुरळक ठिकाणी भाग बदलत पाऊस पडेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. या कालावधीमध्ये पडणारा पाऊस हा प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यात पडेल असं डख यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

राज्यातील इतरही भागात या कालावधीमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. तसेच राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात ढगाळ हवामान राहणार आहे. एकंदरीत सध्या राज्यात कांदा काढणी प्रगतीपथावर आहे आणि अशा परिस्थितीत पडणारा हा पाऊस कांदा पिकासाठी घातक ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे शेतकरी बांधवांना आपल्या शेती पिकांची विशेष काळजी आता घ्यावी लागणार आहे.

हे पण वाचा :- अहमदनगर, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि ‘या’ जिल्ह्यात गारपीट होणार ! IMD चा अंदाज

मे महिन्यात पण पाऊस

गेल्या महिन्यात म्हणजेच मार्च महिन्यात राज्यात दोनदा अवकाळी पाऊस पडला होता. 4 मार्च ते 8 मार्च आणि 14 मार्च ते 16 मार्च दरम्यान राज्यात पाऊस झाला होता. दरम्यान एप्रिल महिन्यात देखील जवळपास गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पाऊस सुरू आहे. शिवाय पुढील तीन ते चार दिवस आणखी पावसाची शक्यता आहे. याव्यतिरिक्त पुढल्या महिन्यात म्हणजेच मे महिन्यात देखील अवकाळी पावसाची शक्यता राहणार आहे. मे महिन्यात दोनदा अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज डख यांनी व्यक्त केला आहे. जर हा अंदाज खरा ठरला तर शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार असल्याचे चित्र आहे.

हे पण वाचा :- तरुणांसाठी आनंदाची बातमी! ITBP मध्ये ‘या’ पदासाठी निघाली भरती; पगार मिळणार तब्बल 85 हजार, पहा भरतीची संपूर्ण माहिती