मोठी बातमी! 7 जुलै 2025 पासून महाराष्ट्रातील ‘ह्या’ शहरातून तिरुपती बालाजीसाठी सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी महाराष्ट्रातून तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांसाठी अधिक खास ठरणार आहे. कारण की रेल्वेकडून तिरुपतीसाठी एक नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे.

Published on -

Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. रेल्वे कडून लवकरच एक नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू केली जाणार आहे. श्रीक्षेत्र तिरुपती बालाजी साठी महाराष्ट्रातील मराठवाड्यातून एक नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार असून या नव्या ट्रेनमुळे मराठवाड्यातील भाविकांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.

खरे तर दरवर्षी लाखोंच्या संख्येने मराठवाडा सहित महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील भाविक तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जात असतात. हेच कारण आहे की रेल्वे कडून आता जालना ते तिरुपती दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे.

या नव्या एक्सप्रेस ट्रेन मुळे मराठवाड्यातील भाविकांना तिरुपतीला जाणे सोयीचे होणार आहे. दरम्यान आता आपण जालना ते तिरुपती या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक तसेच ही गाडी कोणकोणत्या स्थानकावर थांबा घेणार याचा आढावा या लेखातून घेणार आहोत. 

कसं असणार वेळापत्रक?

रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार, जालना – तिरुपती विशेष एक्सप्रेस ट्रेन 7 जुलै 2025 पासून 31 मार्च 2026 या कालावधीत चालवली जाणार आहे.

या काळात ट्रेन क्रमांक 07609 ही विशेष ट्रेन दर सोमवारी सकाळी सात वाजता जालना रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे आणि मंगळवारी सकाळी दहा वाजून 45 मिनिटांनी ही गाडी तिरुपतीला पोहोचणार आहे.

यासोबतच गाडी क्रमांक 07610 दर मंगळवारी दुपारी सव्वातीन वाजता तिरुपती रेल्वे स्थानकावरून सोडले जाणार आहे आणि बुधवारी दुपारी साडेतीन वाजता ही गाडी जालन्याला पोहोचणार आहे. म्हणजेच जालना सहित संपूर्ण मराठवाड्यातील प्रवाशांना अवघ्या तीन दिवसात तिरुपतीचे दर्शन घेता येणे शक्य होणार आहे. 

विशेष एक्सप्रेस ट्रेन कोण-कोणत्या स्थानकावर थांबा घेणार 

जालना ते तिरुपती दरम्यान चालवल्या जाणाऱ्या विशेष एक्सप्रेस ट्रेनला मराठवाड्यातील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबा मंजूर करण्यात आला आहे.

जालना ते तिरुपती दरम्यान चालवल्या जाणाऱ्या या विशेष एक्सप्रेस ट्रेनला दोन्ही दिशांनी 12 महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबा मंजूर करण्यात आला आहे.

जालना ते तिरुपती विशेष एक्सप्रेस ट्रेन तसेच तिरुपती ते जालना विशेष एक्सप्रेस ट्रेन या दोन्ही गाड्यांना परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर रोड, विकाराबाद, लिंगमपल्ली, गुटूर, गुडूर आणि रेनीगुंटा या महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबा मंजूर करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!