गुड न्यूज ! आजपासून सुरु होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, तिरुपतीला जाणे होणार सोपे, राज्यातील ‘या’ आठ रेल्वे स्टेशनवर घेणार थांबा

Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी तिरुपती ला जाणाऱ्या भाविकांसाठी अधिक खास ठरणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या अतिरिक्त गर्दी लक्षात घेता पुन्हा एकदा विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. सुरत रेल्वे मार्गावर प्रवाशांची प्रचंड गर्दी होत आहे आणि याच अनुषंगाने पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा विशेष गाडी चालवली जाणार आहे.

पश्चिम रेल्वे प्रशासन ओखा ते मदुराई यादरम्यान ही विशेष गाडी चालवणार आहे. ही गाडी रेनिगुंटा या स्थानकावर सुद्धा थांबा घेणार आहे. या स्थानकावर उतरून भाविकांना तिरुपतीला जाता येईल. महत्वाची बाब म्हणजे ही गाडी आपल्या महाराष्ट्रातून धावणार आहे.

त्यातल्या त्यात या गाडीला राज्यातील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबा सुद्धा मंजूर करण्यात आला आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा आहे. या गाडीला उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातील काही महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा मंजूर करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

ही गाडी राज्यातील सात ते आठ महत्त्वाच्या स्थानकावर थांबा घेणार आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीचा होईल अशी आशा आहे. ही गाडी आज पासून म्हणजेच 3 नोव्हेंबर पासून प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.

परंतु ही गाडी तात्पुरत्या स्वरूपात चालवली जाणार आहे. दरम्यान आता आपण या गाडीचे संपूर्ण वेळापत्रक तसेच ही गाडी कोणकोणत्या स्थानकावर थांबा घेणार याबाबतची डिटेल माहिती या लेखातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

वेळापत्रक कसे आहे ?

ओखा-मदुराई ही गाडी 3 नोव्हेंबरपासून सुरु होईल ते 24 नोव्हेंबरपर्यंत चालवली जाणार आहे. या काळात ही गाडी सोमवारी रात्री 10:00 वाजता सोडली जाणार आहे आणि गुरुवारी सकाळी 11:40 वाजता मदुराईला पोहोचणार आहे.

तसेच मदुराई-ओखा एक्सप्रेस 7 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर दरम्यान चालवली जाणार आहे. या काळात ही शुक्रवारी पहाटे 4:00 वाजता सोडली जाणार आहे आणि रविवारी सकाळी 10:20 वाजता ती ओखा Railway Station ला पोहोचणार आहे.

कुठे कुठे थांबणार विशेष गाडी

द्वारका

जामनगर

राजकोट

सुरेंद्रनगर

अहमदाबाद

नडियाद

आनंद

वडोदरा

भरूच

उधना

नंदुरबार

अमळनेर

जळगाव

भुसावळ

अकोला

पूर्णा

नांदेड

निजामाबाद

काचेगुडा

महबूबनगर

ढोणे

गूटी

रेनिगुंटा

काटपाडी

वेल्लोर कॅन्टोन्मेंट

तिरुवन्नमलाई

विल्लुपुरम

श्रीरंगम

तिरुच्चिरापल्ली

मानपराई

दिंडीगुल 

कोडाईक्कनाल