Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

आनंदाची बातमी ! मध्य रेल्वेतर्फे मुंबईत ‘या’ रिक्त पदासाठी निघाली भरती, थेट मुलाखतीने होणार उमेदवाराची निवड, वाचा डिटेल्स

Railway Recruitment Mumbai : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सेंट्रल रेल्वेच्या माध्यमातून एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. विशेषता ज्यांना मुंबईमध्ये नोकरी करायची असेल अशा तरुणांसाठी तर हा एक गोल्डन चान्स आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

कारण की, सेंट्रल रेल्वे मुंबई या ठिकाणी काही रिक्त पदांसाठी नुकतीच एक भरती आयोजित झाली आहे. विशेष म्हणजे या पदभरतीच्या माध्यमातून थेट मुलाखत घेऊन उमेदवारांची निवड होणार आहे.

अर्थातच या पदांसाठी कोणतीही लेखी परीक्षा आयोजित केली जाणार नाही तर थेट मुलाखत घेऊन उमेदवाराची निवड अंतिम केली जाईल अशी माहिती समोर आली आहे. अशा परिस्थितीत आज आपण या पदभरती बाबत सर्व आवश्यक माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ भागातील वाहतूककोंडी फुटणार, मुंबई महानगरपालिका विकसित करणार नवीन फ्लायओव्हर, पहा…..

कोणत्या पदासाठी होणार भरती?

अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार मध्य रेल्वे मुंबई येथे वैद्यकीय विभागात विशेषज्ञ / GDMO हे रिक्त पद भरले जाणार आहे.

किती जागांसाठी होणार भरती?

या पदाच्या एकूण सहा रिक्त जागा या भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता? अन वयोमर्यादा 

या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रते संदर्भात सविस्तर अशी माहिती जाणून घेण्यासाठी आपण भारतीय रेल्वेच्या cr.indianrailways.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊ शकता.

या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा 53 वर्षांपेक्षा अधिक वयाचा नसावा. मात्र केंद्र व राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी तसेच निवृत्त वैद्यकीय तज्ञांसाठी वयोमर्यादित सूट दिली जाणार आहे. 

हे पण वाचा :- 10वी पास, ग्रॅज्युएट तरुणांसाठी आनंदाची बातमी ! सेंट्रल जीएसटी आणि कस्टम्स विभागात निघाली ‘या’ पदासाठी भरती, आजच करा अर्ज

निवड कशी होणार?

या पदासाठी थेट मुलाखतीने उमेदवाराची निवड केली जाणार आहे. मुलाखत 24 मे 2023 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटल, सेंट्रल रेल्वे, भायखळा, मुंबई – 400027 या पत्त्यावर आयोजित करण्यात आली आहे. यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागणार आहे.

कोणती कागदपत्रे लागतील 

या पदासाठी मध्य रेल्वेकडून थेट मुलाखत घेऊन उमेदवाराची निवड केली जाणार आहे. यामुळे मुलाखतीच्या वेळी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना काही कागदपत्रे सोबत घेऊन जावे लागतील.

यात जन्माचा दाखला, एमबीबीएस उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका, पदवी PG/DNB उत्तीर्ण प्रमाणपत्र/MCI मान्यताप्राप्त डिप्लोमा, MCI/MMC नोंदणी, एमबीबीएस परीक्षा दिल्याचे प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र, सध्याच्या नियोक्त्याकडून ना हरकत प्रमाणपत्र इत्यादी आवश्यक कागदपत्रांचा समावेश राहणार आहे. 

हे पण वाचा :- मोठी बातमी ! आता मुंबईहुन ‘या’ शहरा दरम्यान सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस, खासदार उदयनराजे यांनी घेतला पुढाकार