चांगल्या पगाराची नोकरी सोडून एखाद्या व्यवसायात पडणे आणि तो व्यवसाय सातत्य आणि जिद्द तसेच मोठ्या कष्टाने उभा करणे व त्याला यशस्वी करणे हे पाहिजे तेवढे सोपे नाही व प्रत्येकाला जमेल अशी गोष्ट नाही. परंतु आपल्याला भारतात असे अनेक उद्योजक किंवा व्यावसायिक दिसून येतात की त्यांनी अगदी शून्यातून सुरुवात केली परंतु आपला प्रयत्न, जिद्द आणि अखंड मेहनतीने आज यशाच्या शिखरावर पोहोचलेले आहेत.
अशीच काहीशी गोष्ट ही राजीव सामंत यांची सांगता येईल. त्यांना भारताचे वाईन किंग म्हणून ओळखले जाते. त्यांनी चांगल्या पगाराची विदेशातील नोकरी सोडली आणि नाशिक येथे सुला विनयार्ड्स या कंपनीची स्थापना केली व आज ही वाईन निर्मिती क्षेत्रातील कंपनी चार हजार तीनशे नऊ कोटी रुपयांची झालेली आहे. त्यांची यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.
राजीव सामंत यांची पार्श्वभूमी
राजीव यांचा जन्म मुंबईमध्ये झाला व तिथेच त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. परंतु उच्च शिक्षण घेण्याकरता मात्र त्यांनी अमेरिकेचा रस्ता धरला व त्या ठिकाणी प्रसिद्ध असलेल्या स्टॅनफोर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रामध्ये पदवी घेतली आणि एवढेच नाही तर अभियांत्रिकी व्यवस्थापनामध्ये देखील पदव्युत्तर पदवी मिळवली.
पण भारताच्या मातीत जन्मलेला या युवकाने भारताबद्दल आणि भारतातील शेती बद्दल नितांत असलेले प्रेम कायम हृदयात जपले. चांगला अभ्यास केल्यानंतर त्यांनी अमेरिकेमध्येच ओरॅकल कॉर्प सुरू केले व एखाद्या मोठ्या कंपनीत काम केल्यासारखे त्याच्या स्वरूप होते. या सगळ्या गोष्टीत त्यांचे मन रमले नाही आणि चक्क ते भारतात परतले व नाशिकमध्ये त्यांच्या कुटुंबाची वीस एकर शेती होती व ती शेती करायला त्यांनी सुरुवात केली.
या शेतीमध्ये त्यांनी आंबा तसेच गुलाब आणि द्राक्ष लागवड करून त्याचे उत्पादन घ्यायला सुरुवात केली. शेतीमध्ये पडल्यानंतर त्यांना काही वर्षांनी जाणवले की नाशिक जिल्ह्यातील हवामान हे वाईन द्राक्ष पिकवण्यासाठी चांगले आहे.
अशाप्रकारे केली सुला वाइनयार्ड्सची सुरुवात
या सगळ्या प्लॅनिंगमध्ये ते कॅलिफोर्नियाला गेले आणि त्या ठिकाणी एका प्रसिद्ध असलेल्या वाईन मेकरला भेटले. त्या व्यक्तीने वायनरी सुरू करण्यासाठी राजीव सामंत यांना पूर्ण मदत करण्याचे मान्य केले व खूप कष्ट घेऊन राजीव सामंत यांनी सुला वाईनयार्ड्सची सुरुवात केली.
भारताचे वाइन कींग म्हणून आहेत प्रसिद्ध
राजीव सामंत यांना वाईन किंग ऑफ इंडिया म्हणजेच भारताचे वाईन किंग म्हणून देखील संबोधले जाते. 1999 मध्ये त्यांनी नाशिक मध्ये सुला विनयार्ड्सची सुरुवात केली. हे नाशिक मधील पहिली वायनरी होती व आज राजीव हे या कंपनीची एमडी, सीईओ आणि प्रमोटर देखील आहेत. आज या कंपनीचे मार्केट व्हॅल्यू जवळपास चार हजार तीनशे नऊ कोटी रुपये इतके आहे व इतकेच नाही तर देशातील सर्वात मोठ्या वाईन उत्पादकांपैकी ही कंपनी एक आहे.