सांगलीच्या शेतकऱ्याचा नादखुळा ! चक्क काळ्या गव्हाची सुरु केली शेती; मिळवलं दर्जेदार उत्पादन, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sangli News : भारतीय शेतीत काळाच्या ओघात मोठा बदल झाला आहे. शेतकऱ्यांनी आता शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग सुरू केले आहेत. विशेषता पीक पद्धतीत मोठा बदल केला आहे. असाच एक बदल राज्यातील सांगली जिल्ह्यातही पाहायला मिळाला आहे. सांगली जिल्ह्यातील एका परिवर्तन शेतकऱ्यांनी चक्क काळ्या गव्हाची लागवड करून दाखवली आहे. विशेष बाब अशी की या पठ्ठ्याला या पिकातून चांगली कमाई होण्याची आशा देखील आहे.

सध्या हे पीक काढणीच्या अवस्थेत असून येत्या काही दिवसात यापासून त्यांना चांगलं उत्पादन मिळणार आहे. सातारा जिल्ह्यातील नागठाणे जवळील जांभळी वाडी येथील संदीप जांभळे यांनी हा प्रयोग केला आहे. निश्चितच जांभळे यांचा प्रयोग पंचक्रोशीत पहिलावहिला प्रयोग असल्याने मोठा चर्चेचा विषय आहे. जांभळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी नोव्हेंबर महिन्यात वेळेवर या काळ्या गव्हाची पेरणी केली.

त्यांनी नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात याची पेरणी केली. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, वेळेवर गहू पेरणी करण्याची वेळ ही 15 नोव्हेंबर पर्यंत असते यानंतर पेरला जाणारा गहू हा कमी उत्पादन देतो. गहू पेरणी ही ट्रॅक्टरच्या सहाय्याने करण्यात आली. हाती आलेल्या माहितीनुसार, पंजाब राज्यातील मोहाली स्थित राष्ट्रीय कृषी अन्न व जैव तंत्रज्ञान संस्था ज्याला नाबी असं म्हटलं जातं या संस्थेने या काळ्या गव्हाची जात विकसित केली आहे. हा काळा गहू आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेमंद असल्याचे मत या संस्थेने व्यक्त केल आहे.

नाबी ही संस्था या गव्हाबाबत माहिती देताना सांगते की, हा काळा गहू सुमारे सात वर्षाच्या संशोधनानंतर विकसित झाला आहे. या गव्हाच्या जातीपासून उत्पादित होणाऱ्या गव्हात साखरेचे प्रमाण कमी असते म्हणून आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. तसेच या मध्ये फॉलिक ऍसिड, बी जीवनसत्व यांसारखे आरोग्याला आवश्यक असलेले घटक देखील मोठ्या प्रमाणात आढळतात. यामुळे या गव्हाचे सेवन मानवी आरोग्यासाठी अति फायदेशीर असून याची बाजारात कायमच मागणी असते.

यामुळे जांभळे यांना देखील या काळ्या गव्हापासून चांगले उत्पादन मिळेल अशी आशा असून याला चांगला दर मिळेल अशी देखील त्यांनी यावेळी खात्री व्यक्त केली आहे. निश्चितच सांगलीच्या या पठ्याने केलेला हा प्रयोग इतर शेतकऱ्यांना वेगवेगळे प्रयोग करण्यास प्रेरक ठरेल. जर काळाच्या ओघात शेतीमध्ये असेच नवनवीन प्रयोग करत राहिले तर निश्चितच शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळेल आणि त्याची आर्थिक परिस्थिती सदृढ होईल.