सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी खुशखबर ! बहुचर्चित सहापदरी महामार्गाचा लवकरच होणार श्रीगणेशा

Satara Kagal Expressway : महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महामार्गाची कामे सुरु आहेत. काही ठिकाणी महामार्गाच्या कामाला सुरुवात होत आहे तर काही महामार्गासाठी भूसंपादनाची कामे केली जात आहेत.

तसेच काही महामार्गांचा लोकार्पण सोहळा पार पाडण्याच्या तयाऱ्या केल्या जात आहेत. आता सातारा-कागल या महामार्गाबाबत एक महत्त्वाच अपडेट हाती आल आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या बहुचर्चित सहा पदरी महामार्गाच्या कामाचा लवकरच आरंभ होणार आहे. हा महामार्ग पुणे बेंगलोर एक्सप्रेस वे वरील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून ओळखला जात आहे. सातारा कागल हा एकूण 127 km लांबीचा महामार्ग राहणार आहे.

या महामार्गामुळे सातारा ते कोल्हापूर जिल्ह्यातील कागल हा प्रवास अधिकच सुलभ होणार आहे. यामुळे या रूट दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशी गेल्या अनेक दिवसांपासून या महामार्गाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान आता हा महामार्ग लवकरच तयार होणार असल्याचे चित्र आहे.

सदर महामार्गावर एकूण 11 ठिकाणी उड्डाणपुले विकसित केली जाणार आहेत. या कामासाठी आवश्यक सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. निविदा काढल्या गेल्या असून दोन कंपन्यांना कामे देण्यात आले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या महामार्गाचे काम रखडले होते.

मात्र आता या महिन्याअखेर महामार्गाचे काम सुरू होणार असल्याचे एका मीडिया रिपोर्ट मध्ये सांगितले गेले आहे. त्यामुळे निश्चितच सातारा तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक दिलासादायक चित्र उभे झाले आहे. या महिन्याअखेर या महामार्गाचे काम सुरु झाल्यास 2025 पर्यंत सर्वसामान्यांना हा महामार्ग खुला होणार आहे.

महामार्गावर या ठिकाणी उभारले जाणार उड्डाणपूल

या सदर महामार्गावर नागाव फाटा, लक्ष्मी टेकडी, अंबप फाटा, कणेगाव, येलूर फाटा, वाघवाडी, नेर्ले, शेणे-येवलेवाडी, कराड-मलकापूर, मसूर फाटा, नागठाणे या ठिकाणी उड्डाणपूल विकसित केले जाणार आहेत. तसेच सांगली फाटा या ठिकाणी महामार्गाची उंची थोडीशी वाढवली जाणार असल्याचे सांगितले गेले आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून येत्या काही दिवसात ठेकेदाराला वर्क ऑर्डर देण्यात येणार आहे. वर्क ऑर्डर दिल्यानंतर हे काम दोन वर्षात पूर्ण करण्याची सक्ती ठेकेदाराला राहणार आहे. अशा परिस्थितीत 2025 पर्यंत हा महामार्ग प्रवाशांसाठी मोकळा राहणार आहे.

या महामार्गाबाबत अधिक माहिती अशी की, महामार्गासाठी आवश्यक भूसंपादनाची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. फक्त कराड तालुक्यातील सात गावांचे भूसंपादन बाकी असून लवकरच हे काम देखील पूर्ण होणार आहे. निश्चितच दोन वर्षात महामार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.