बातमी कामाची ! ‘शेतकरी असल्याच्या दाखल्या’बाबत झाला मोठा निर्णय; वाचा सविस्तर….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Shetkari Dakhla Marathi : राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना कार्यरत करण्यात आल्या आहेत. विशेषता शेतकऱ्यांसाठी नवनवीन उपक्रम आणि योजना शासन कायमच राबवत असते. गेल्या एक दशकांपासून शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत.

त्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात आहे. अधिका-अधिक शेतकऱ्यांनी शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापित कराव्या, उत्पादन वाढवावे असा शासनाचा मानस आहे. शेतकरी गटाला आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचा देखील लाभ मिळतो.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो सावधान ! ‘या’ तारखेला पुन्हा अवकाळी पाऊस बरसणार; पंजाबरावांचा अंदाज

यामुळे शेतकरी देखील आता मोठ्या प्रमाणात शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापित करू लागले आहेत. यासाठी मात्र महिला शेतकऱ्यांना काही अडचणी येत होत्या. जसं की आपणास ठाऊकच आहे महिला शेतकऱ्यांना शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये सामील होण्यासाठी शेतकरी असल्याचा दाखला सादर करावा लागतो.

कंपनी निबंधकांकडून अशा दाखल्याची मागणी केली जात होती. खरं पाहता, शेतकरी कुटुंबातील महिला आणि अन्य सदस्य ज्यांच्या नावावर जमीन नाही त्यांना हा दाखला मिळवताना अनेक अडचणी येत होत्या. यासाठी महिला शेतकऱ्यांना मोठी धावपळ करावी लागायची. शासकीय कार्यालयात पायपिट करावी लागायची. यामुळे अनेक महिला शेतकरी इच्छा असून देखील या कंपन्यात सामील होत नव्हते.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो काळजी घ्या ! ‘हे’ दोन दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडणार, हवामान विभागाचा गंभीर इशारा

परिणामी कृषी आयुक्तांनी याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. शेतकरी असल्याच्या दाखल्याबाबत कृषी आयुक्तांनी महिला शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या आणि आता हा दाखला देणेबाबत तालुका कृषी अधिकारी यांना परिपत्रक काढले आहे. म्हणजेच आता तालुका कृषी अधिकारी शेतकरी असल्याचा दाखला देण्यास सक्षम राहणार असून त्या अनुषंगाने एक परिपत्रक कृषी आयुक्तांच्या माध्यमातून काढण्यात आले आहे.

यानुसार राज्यातील सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. या ठिकाणी एक विशेष गोष्ट अशी की, हा शेतकरी असल्याचा दाखला केवळ आणि केवळ महिलांना आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये सामील होण्यासाठी दिला जाणारा दाखला राहणार आहे. 

हे पण वाचा :- मोठी बातमी! ‘त्या’ एसटी कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई; महामंडळाचे पत्र निर्गमित