स्कायमेट वेदरचा अंदाज आला रे…! यंदा कसा असणार मान्सून? अल निनो राहणार का? पहा काय म्हणतंय Skymet Weather

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Skymet Weather Monsoon 2023 : अमेरिकन हवामान विभागाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी भारतासह आशिया खंडाबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. अमेरिकेच्या हवामान विभागाने भारतात दुष्काळ पडणार असल्याचे भाकीत वर्तवले आहे. तेव्हापासून देशात मान्सूनबाबत वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहेत. अशातच आता हवामान अंदाज वर्तवणारी खाजगी संस्था स्कायमेटने मान्सून बाबत आपला पहिला अहवाल सार्वजनिक केला आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की स्कायमेट ही देशातील एक हवामान अंदाज वर्तवणारी खाजगी आणि प्रतिष्ठित संस्था आहे. या संस्थेने नुकताच 2023 च्या मान्सून बाबत आपला पहिला अहवाल सादर केला आहे. या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या मानसून काळात पाऊस हा सामान्य पेक्षा कमी पडणार आहे.

हे पण वाचा :- कोकणच्या केशर आंब्याप्रमाणे प्रसिद्ध आहे अहमदनगरमधील ‘टिकल्या आंबा’; याची शेती शेतकऱ्यांसाठी ठरतेय लाखमोलाची, वाचा याच्या विशेषता

अल निनो या हवामान प्रणालीमुळे यावर्षीचा मान्सून कमकुवत राहणार आहे. सामान्य पाऊस पडण्याची शक्यता केवळ पंचवीस टक्के असल्याचा अंदाज या संस्थेने व्यक्त केला असून यंदाच्या मान्सून मध्ये दीर्घ कालावधीत 94% पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे. तसेच या संस्थेने दुष्काळ पडण्याची शक्यता 20 टक्के असल्याचा अंदाज बांधला आहे.

एकंदरीत अलनिनो या घटकामुळे यावर्षी मानसून प्रभावित होणार आहे. यामुळे दुष्काळाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. मात्र दुष्काळाची शक्यता ही 20% च आहे. मात्र असे असले तरी 1997 मध्ये अल निनो हा घटक कार्यान्वित होता तरीही देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला होता.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो इकडे लक्ष द्या! ‘ही’ कागदपत्रे तयार असतील तरच मिळणार कांदा अनुदानाचे पैसे, पहा….

तसेच 2004 मध्ये अलनिनो कमकुवत होता तरीदेखील भीषण दुष्काळाचा सामना देशवासियांना करावा लागला होता. एकंदरीत यंदाचा मान्सून हा समाधानकारक राहणार नाही असा अंदाज स्कायमेटचा आहे. या मान्सून मध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस राहणार आहे.

दुष्काळाची शक्यता असल्याचा अंदाज देखील या संस्थेचा आहे. साहजिकच पावसाळ्यात कमी पाऊस पडला म्हणजे यामुळे शेतीचे क्षेत्र विशेष प्रभावित होईल आणि शेतीमुळे इतरही क्षेत्र प्रभावित होतील आणि मंदीची चाहूल जाणवेल. दरम्यान आता स्कायमेटचा हा अंदाज कितपत खरा ठरतो हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

हे पण वाचा :- पंजाबराव डख यांची मोठी माहिती; मे महिन्यातही अवकाळी पाऊस; जून महिन्याच्या ‘या’ तारखेला मान्सून करणार एन्ट्री ! ‘असा’ राहणार यंदाचा पावसाळा