यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन पिकाला ‘हे’ एक खत द्या उत्पादनात होणार विक्रमी वाढ, वाचा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Crop Management : सोयाबीन हे मध्यप्रदेश महाराष्ट्र राजस्थान आणि बिहार या राज्यात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. या पिकाला कॅश क्रॉप म्हणून ओळखलं जातं. या पिकाच्या वाढीसाठी मात्र काही पोषक घटकांची पूर्तता शेतकऱ्यांना करावी लागते. यासाठी शिफारशीत मात्रांमध्ये खते पिकाला द्यावे लागतात.

या तेलबिया पिकाच्या वाढीसाठी शेतकऱ्यांना फॉस्फरस, बोरॉन, झिंक, सल्फर आणि कॅल्शियम या पाच पोषक घटकांची पूर्तता करावी लागते. दरम्यान या पाच घटकांची पूर्तता करण्यासाठी शेतकरी बांधव एका खताचा वापर करू शकतात.

आज आपण हे खत नेमके कोणते आहे याचा वापर कसा केला जाऊ शकतो, केव्हा करायचा या संदर्भात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आरएम फॉस्फेट्स अँड केमिकल्स प्रा. लिमिटेड या कंपनीचे महावीर झिरॉन या खतात हे पाचही पोषक घटक आढळतात.

यामुळे या खताचा वापर केला सोयाबीन पिकातून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळू शकते. दरम्यान आज आपण या खताचा वापर कसा करायचा याविषयी जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मात्र या खतामध्ये आढळणारे हे पाच पोषक घटक सोयाबीन पिकाच्या वाढीसाठी कशा पद्धतीने कार्य करतात या संदर्भात थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया.

हे पण वाचा :- सोयाबीनच्या उच्च उत्पादन देणाऱ्या जाती कोणत्या आणि त्यांच्या विशेषता, पहा…

स्फुरद – तज्ञ लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फूरद म्हणजे फॉस्फरस हे सोयाबीन झाडाची मुळे जाड आणि निरोगी बनवते, ज्यामुळे शेंगातील दाणे चांगले आणि अधिक भरतात आणि मालाची क्वालिटी देखील वाढते. 

बोरॉन – बोरॉन हे एक पोषक घटक आहे जे विविध पिकांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त ठरते. हे पोषक घटक सोयाबीन पिकांमध्ये फुलांची गळती रोखते आणि फुलांचे जास्तीत जास्त प्रमाणात शेंगांमध्ये रूपांतर करते. म्हणजेच फळधारणा घडवून आणण्यासाठी बोरॉन या पोषक घटकाचा मोठा वाटा आहे.

झिंक – झिंक हे देखील सोयाबीन पिकवाढीसाठी महत्त्वाची भूमिका निभावत असते. हे पोषक घटक सोयाबीन पिकामध्ये नायट्रोजनचा वापर वाढवते, जे प्रथिने संश्लेषणासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे सोयाबीनचे रोप निरोगी राहते. परिणामी सोयाबीन पीक उत्पादनात वाढ होत असते. 

सल्फर – हे देखील पीक वाढीसाठी एक उपयुक्त पोषक घटक म्हणून ओळखले जाते. सल्फर सोयाबीन पिकात जास्तीत जास्त तेल तयार करण्यास मदत करते. सोयाबीन हे एक प्रमुख तेलबिया पिक आहे यामुळे याच्या बियांमध्ये तेलाचे प्रमाण अधिक असणे आवश्यक आहे. म्हणून सोयाबीन मध्ये तेलाचे प्रमाण वाढवण्यासाठी सल्फर म्हणजेच गंधकाचा संतुलित प्रमाणामध्ये वापर करणे गरजेचे आहे. तज्ञ लोक सोयाबीन पिकाला गंधकाचा योग्य प्रमाणात पुरवठा करण्याचा सल्ला देतात.

कॅल्शियम – कॅल्शियम हे विविध पीक वाढीसाठी आवश्यक पोषक घटक आहे. यामुळे सोयाबीनच्या पिकाला देखील मोठी मदत मिळते. या घटकाचा सोयाबीन पिकात योग्य प्रमाणात वापर केला तर सोयाबीन दाण्यांच्या त्वचेला चमक आणि कडकपणा येतो, ज्यामुळे धान्यांची साठवण क्षमता देखील वाढते. यामुळे कॅल्शियमचा देखील योग्य आणि संतुलित मात्रांमध्ये पिकाला पुरवठा करायला पाहिजे.

हे पण वाचा :- 10वी, 12वीत पास झालेल्या विद्यार्थ्यांना मिळणार दहा हजार रुपये ! कोणते विद्यार्थी राहणार पात्र? वाचा….

कसा करणार या खताचा वापर 

एका मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार, सोयाबीन पिकाच्या चांगल्या वाढीसाठी आणि उत्पादन चांगले मिळावे म्हणून महावीर झिरॉन 150 किलो, एमओपी 26 किलो, सिमट्रॉन 4 किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो प्रति एकर या प्रमाणात पेरणीच्या वेळी बेसल डोस म्हणून दिले पाहिजे. यानंतर मग सोयाबीन पिक 25-30 दिवसांचे झाल्यावर युरिया 12/ प्रति एकर वापरावे. तसेच पिक पेरणीच्या 40-50 दिवसांनी अॅमिट्रॉन-एल 500 मिली/लिटर आणि बोरॉन 250 ग्रॅम/ प्रति एकर देण्याची शिफारस करण्यात आली आहे.

शेतकरी मित्रांनो मात्र कोणत्याही खतांचा आणि औषधांचा वापर करण्यापूर्वी तज्ञ लोकांचा तसेच कृषी सेवा केंद्र चालक यांचा सल्ला घेणे आवश्यक राहणार आहे. ही केवळ सामान्य माहिती आहे, हा खत किंवा औषध वापरण्याचा सल्ला राहणार नाही.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! राज्यातील ‘इतक्या’ हजार शेतकऱ्यांना मिळणार अनुदानावर ट्रॅक्टर, वाचा…