श्रीगोंदा तालुक्यात मोठा भूकंप ! एका राजकीय नेत्याच्या मुलास अटक ! दुसराही पोलिसांच्या रडारवर

बाळासाहेब नाहाटा यांचा मुलगा नितेश नाहाटा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. दरम्यान, मितेश यांना एका फसवणुकीच्या प्रकरणात इंदोर पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे सध्या तालुक्यात एकच खळबळ माजली आहे.

Tejas B Shelar
Published:
Shrigonda News

Shrigonda News : श्रीगोंदा तालुक्यातून एक मोठी खळबळजनक बातमी समोर येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय बाळासाहेब नाहाटा यांच्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामुळे श्रीगोंदा तालुक्यासहित संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

बाळासाहेब नाहाटा यांचा मुलगा मितेश नाहाटा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. दरम्यान, मितेश यांना एका फसवणुकीच्या प्रकरणात इंदोर पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे सध्या तालुक्यात एकच खळबळ माजली आहे.

साखर गैरव्यवहार प्रकरणात इंदौरच्या पोलिसांनी बाळासाहेब नाहाटा यांच्या मुलाला अटक केली आहे. दरम्यान इंदोर पोलिसांनी मितेश याला ताब्यात घेतल्यानंतर पक्षाने त्याच्यावर मोठी कारवाई केली आहे.

त्याला पदावरून बडतर्फ करण्यात आले असून याबाबतचे पत्र जारी करण्यात आले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुरज चव्हाण यांनी याबाबतचे परिपत्रक काढले आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की बाळासाहेब नाहाटा यांच्या मुलाने आणखी एका व्यक्तीसोबत मिळून इंदूर येथील एका व्यापाऱ्याची फसवणूक केली आहे.

या दोघांनी इंदोर येथील व्यापाऱ्याला साखर देण्याच्या बदल्यात कोट्यावधीचा गंडा घातल्याची फिर्याद इंदौर पोलीस ठाण्यात नुकतीच दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी तेथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत मितेश नाहाटाला ताब्यात घेतले.

विशेष बाब अशी की या प्रकरणात जी फिर्याद देण्यात आली आहे त्यामध्ये उल्लेख असणारा दुसरा आरोपी हा श्रीगोंदा तालुक्यातीलच एका दिवंगत नेत्याचा मुलगा असल्याची माहिती समोर येत आहे.

यामुळे मात्र श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. दुसरीकडे नाहाटा यांच्या मुलाचे नाव या प्रकरणात समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ताबडतोब या प्रकरणी कारवाई करत त्यांना पदावरून बडतर्फ केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe