एसटी तिकीट दरात महिलांना 50% सवलत; आतापर्यंत ‘इतक्या’ महिलांनी घेतला लाभ, प्रवासापूर्वी योजनेचे नियम आणि शर्ती माहिती करून घ्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

St Half Ticket Scheme For Women Maharashtra : यंदाच्या राज्य अर्थसंकल्पात शिंदे फडणवीस सरकारने महिलांसाठी एक विशेष योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना आता तिकीट दरात 50 टक्के सवलतीने एसटीमध्ये प्रवास करता येणार आहे. जरी या योजनेचे अर्थसंकल्पात घोषणा झाली असेल तरीदेखील याची प्रत्यक्ष अंमलबजावणी 17 मार्च 2023 पासून शिंदे फडणवीस शासनाने सुरू केली आहे. म्हणजेच आज या योजनेला सुरवात होऊन चार दिवस झाले आहेत.

दरम्यान या योजनेला राज्यभरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला आहे. राज्यातील लाखो महिलांनी या योजनेचा लाभ घेत अर्ध्या तिकिटात प्रवास केला आहे. महिलांच्या मते, शिंदे फडणवीस सरकारच्या या नवीन योजनेमुळे त्यांना मोठा फायदा होत असून आता माहेरची वाट अजूनच जवळ होणार आहे. पण या योजनेअंतर्गत जे काही नियम आणि अटी आहेत ते सर्वसामान्य महिलांना माहिती नसल्याने अनेक ठिकाणी काही अडचणी देखील आल्या.

काही ठिकाणी यामुळे गदारोळ झाला. परंतु असे असले तरी या शासनाच्या नवीन योजनेमुळे महामंडळाला नवसंजीवनी मिळत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विशेषता कोरोना काळापासून आर्थिक संकटाचा सामना करत असलेले महामंडळ यामुळे उभारी घेईल अशी परिस्थिती आता तयार होत आहे. दरम्यान आज आपण आपल्या वाचक मित्रांसाठी शासनाने सुरू केलेल्या या योजनेअंतर्गत काय नियम आणि अटी आहेत याविषयी सविस्तर माहिती घेऊन हजर झालो आहोत.

हे पण वाचा :- मुंबई-गोवा महामार्गाबाबत मोठी बातमी! ‘या’ महिन्यात पूर्ण होणार काम, पहा किती काम आहे बाकी?

एसटी तिकीट दरात 50 टक्के सवलतीच्या योजनेचे नियम

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, ही योजना सुरू झाल्यापासून पुणे विभागात तब्बल एक लाख एकतीस हजार महिला प्रवाशांनी याचा लाभ घेतला आहे. यामुळे महामंडळाकडे 35 लाख रुपयांचा गल्ला जमा झाला आहे. अवघ्या तीनच दिवसात झालेली ही विक्रमी कमाई यामुळे महामंडळाला या योजनेचा सर्वाधिक फायदा होत आहे. त्यांना देखील या योजनेअंतर्गत अर्ध्या तिकिटात प्रवास करता येत असल्याने त्यांच्याकडून या योजनेबाबत समाधान व्यक्त होत आहे. मात्र असे असले तरी या योजनेबाबत महिलांकडून काही प्रश्न उपस्थित होत आहेत. यामध्ये या योजनेचा लाभ रिझर्वेशन केले असता मिळेल का? कोणत्या बस मध्ये सवलत मिळणार? एसी बस मध्ये सवलत असेल का? यांसारखे प्रश्न प्रामुख्याने उपस्थित केले जात आहेत. दरम्यान आज आपण या योजनेच्या नियमाबाबत थोडक्यात पण सविस्तर जाणून घेणार आहोत.

कोणत्या बस मध्ये मिळणार सवलत

या योजनेअंतर्गत महिलांना 50 टक्के तिकीट दरात सवलत दिली जात आहे. ही सवलत महामंडळाच्या सर्व बसेस मध्ये लागू राहणार आहे. साधी, मिनी बस, निमआराम म्हणजेच एशियाड गाडी, विनावातानुकुलित शयनयान, शिवशाही, शिवनेरी, शिवाई या बसेस मध्ये ही सवलत मिळेल.

तिकीटमध्ये बदल राहणार का 

महिलांसाठी या सवलतीच जे तिकीट असेल त्याची रंगसंगती मात्र बदल राहणार आहे.

हे पण वाचा :- Panjabrao Dakh : पंजाबराव डख हवामान अंदाज सांगणं बंद करणार? पहा नेमकं काय आहे हे प्रकरण

50% सवलत पण अतिरिक्त कर लागणार 

या ठिकाणी एक गोष्ट विशेष ध्यानात ठेवण्यासारखी ती म्हणजे शासनाकडून जरी 50% सवलत दिली जात असली तरी देखील ही सवलत फक्त तिकीट दरात दिली जात आहे. म्हणजे भाड्यातील अपघात साहाय्यता निधी आणि एसी बससेवांकरीता वस्तु व सेवाकरची रक्कम प्रवाशांना द्यावी लागणार आहे. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जर एका स्टॉपचे तिकीट दहा रुपये असेल तर महिलांना तिकीट दरात पाच रुपये सवलत म्हणजेच तिकीट दर पाच रुपये आणि त्यावर इतर कर दोन रुपयाचा असे सात रुपये तिकीट आकारले जाईल.

राज्यातील किती जिल्ह्यात सुरू आहे ही योजना

ही योजना महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात सुरू आहे. मात्र राज्याबाहेर प्रवास करायचा असेल तर त्या ठिकाणी तिकीट दरांमधील ही सवलत लागू राहणार नाही. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जर एखादी महिला गुजरात मधील एखाद्या शहरात एसटीने प्रवास करू इच्छित असेल तर तिला महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत 50% तिकीट दराची सवलत लागू राहील मात्र त्या पुढ त्या महिलेला पूर्ण तिकीट काढावे लागेल. 

शहरांतर्गत मिळणार का या योजनेचा लाभ?

शहरी महिलांकडून सर्वाधिक विचारला जाणारा हा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे नाही. शहरी वाहतुकीमध्ये महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

आरक्षण केल्यास लाभ मिळणार का?

अनेक महिलांचा हा प्रश्न होता की आरक्षण केल्यानंतर या योजनेचा लाभ घेता येईल का? तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की या योजनेचा लाभ आरक्षण केल्यानंतर मिळणार नाही.

इतर सवलत अनुज्ञय असलेल्या महिलांना पण मिळणार का याचा लाभ

जसं की आपणास ठाऊकच आहे पाच ते बारा वयोगटात येणाऱ्या मुलींना आधीच तिकीट दरात सवलत असते. त्यामुळे या वयोगटातील मुलींना याचा लाभ मिळणार नाही. तसेच 75 वर्षावरील महिलांना शासनाने नुकतीच सुरू केलेली ज्येष्ठांसाठीची मोफत प्रवास योजना लागू राहील म्हणजेच 75 वर्षांवरील महिलांना मोफत प्रवास या ठिकाणी राहणार आहे. तसेच ज्या महिला दिव्यांग असतील त्यांना यापूर्वीच शासनाकडून सवलत देऊ केली जाते म्हणून या महिलांना देखील याची सवलत राहणार नाही.

हे पण वाचा :- राज्य शासनाचा मोठा निर्णय! राज्यात वाळूचे लिलाव बंद; आता 8 हजाराची वाळू मिळणार मात्र ‘इतक्या’ रुपयात घरपोच, महसूलमंत्री पाटील यांची माहिती