राज्य शासनाचा मोठा निर्णय ! आता ‘या’ शिक्षकांच्या पगारात केली दुप्पट वाढ, उपमुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

State Employee News : 9 मार्च 2023 रोजी शिंदे फडणवीस सरकारने आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला. यावेळी वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून राज्यातील सर्वच घटकातील नागरिकांना खुश करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांनी महिला, शासकीय कर्मचारी, कामगार, शेतकरी, दिव्यांग इत्यादी प्रवर्गातील आणि घटकातील लोकांसाठी कल्याणकारी योजनेच्या घोषणा काल केल्या आहेत.

राज्य शासनातील कर्मचाऱ्यांसाठी देखील घोषणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याच्या घोषणेचा देखील समावेश आहे. आता अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 1500 रुपयांची वाढ झाली आहे. म्हणजेच आता या सेविकांना दहा हजार रुपये प्रति महिना एवढं मानधन मिळणार आहे.

यासोबतच राज्यातील शिक्षण सेवकांच्या मानधनाबाबत देखील काल मोठी घोषणा वित्तमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. काल अर्थसंकल्प सादर करताना फडणवीस यांनी शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. वास्तविक गेल्या काही दिवसांपूर्वी शिंदे फडणवीस सरकारने शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करू असे जाहीर केलं होतं. याच पार्श्वभूमीवर काल घोषणा करण्यात आली आहे.

आता राज्यातील शिक्षण सेवकांना सरासरी दहा हजार रुपये प्रति महिना इतकं मानधन वाढीचा लाभ मिळणार आहे.आम्ही आपणास सांगू इच्छितो की, आतापर्यंत राज्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षणसेवक यांना 6000 रुपये प्रति महिना इतका मानधन शासनाच्या माध्यमातून दिल जात होतं. मात्र आता यामध्ये दहा हजार रुपयांची वाढ झाली असून या शिक्षण सेवकांना आता 16,000 रुपये प्रति महिना मानधन देऊ केलं जाणार आहे.

यासोबतच आतापर्यंत माध्यमिक शिक्षण सेवक यांना 8000 रुपये इतकं मानधन शासनाच्या माध्यमातून मिळत होतं मात्र आता यामध्ये देखील दहा हजाराची वाढ झाली आहे म्हणजेच या शिक्षण सेवकांना देखील आता 18,000 रुपये इतकं मानधन मिळणार आहे. तसेच उच्च माध्यमिक शिक्षण सेवक यांना 9000 रुपये मानधन मिळत होत. मात्र आता या कर्मचाऱ्यांच्या मानधनात अकरा हजार रुपये इतकी वाढ करण्यात आली असून या कर्मचाऱ्यांना आता 20,000 रुपये मानधन देऊ केल जाणार आहे.