मोठी बातमी ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्याच्या वेतनाबाबत मोठी अपडेट; शासन निर्णय निर्गमित, पहा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

State Employee News : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा संदर्भात एक मोठी अपडेट हाती आली आहे. ही अपडेट शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्याच्या वेतना संदर्भात. हाती आलेल्या माहितीनुसार, शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत येणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्याच्या वेतनासाठी अनुदान वितरण करण्यात आले आहे.

यासाठी महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून 10 एप्रिल 2023 रोजी अर्थातच सोमवारी एक सविस्तर असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. यामुळे आत्ता राज्यातील राज्य शासकीय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्याच्या वेतनाचा तिढा सुटला आहे. या कर्मचाऱ्यांना आता लवकरात लवकर वेतन अदा केल जाणार आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा ! अवकाळीच संकट अजून गेलेल नाही; ‘या’ जिल्ह्यात पुढील पाच दिवस पडणार मुसळधार पाऊस आणि गारपीट

वास्तविक गेल्या महिन्यात राज्य शासकीय सेवेतील कार्यरत कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपावर गेले होते. जुनी पेन्शन योजना या प्रमुख मागणीसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी चांगलाच लढा दिला होता.

वास्तविक हा बेमुदत संप होता मात्र राज्य कर्मचाऱ्यांच्या संघटनांची शिंदे फडणवीस सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर आणि शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात सकारात्मकता दर्शविल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला. 14 मार्चला संप सुरू झाला आणि 21 मार्चला या संपाचा शेवट झाला. मात्र, संपकाळातील वेतन कर्मचाऱ्यांना न देण्याचा निर्णय घेण्यात आला.

हे पण वाचा :- अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! शिंदे सरकारने दिली 63 कोटींची मदत; केव्हा खात्यात जमा होणार? पहा…..

यामुळे कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नाराजी व्यक्त करण्यात आली. यामुळे कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत या विषयावर चर्चा केली आणि शिंदे यांनी संपात सामील झालेल्या कर्मचाऱ्यांना संप काळातील वेतन दिले जाईल अशी ग्वाही यावेळी दिली.

मात्र याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला नसल्याने मार्च महिन्यातील वेतनात म्हणजे एप्रिलमध्ये मिळणाऱ्या वेतनात कपात केली जाते का? की कर्मचाऱ्यांना संप काळातील देखील वेतन दिले जाते याकडे आता सर्वांचेच लक्ष लागून राहणार आहे.

हे पण वाचा :-मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! म्हाडा ‘या’ महिन्यात काढणार 4 हजार घरांच्या लॉटरीची जाहिरात, पहा….