ब्रेकिंग ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा; आता मिळणार ‘इतकं’ वेतन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

State Employee News : गेल्या महिन्यात राज्यातील 18 लाख कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करा या आपल्या प्रमुख मागणीसाठी बेमुदत संप पुकारला होता. गेल्या महिन्यातला हा संप जवळपास सात दिवस सुरू होता, यानंतर कर्मचारी शिष्टमंडळाने राज्य शासनाशी चर्चा केल्यानंतर संप मागे घेण्यात आला होता.

दरम्यान, तीन एप्रिल पासून राज्यातील नायब तहसीलदार आणि तहसीलदार यांनी देखील वेतनश्रेणीत सुधारणा करा या आपल्या प्रमुख मागणीसाठी तीन एप्रिल पासून बेमुदत संप पुकारला होता. आज संपाचा तिसरा दिवस आणि आज या संपावर तोडगा काढण्यात आला आहे. खरं पाहता काल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दालनात या संदर्भात एक महत्वपूर्ण बैठक पार पडली.

हे पण वाचा :- जर शासनाने ‘हा’ निर्णय घेतला तर कर्मचाऱ्यांच्या वेतनात होणार दुपटीने वाढ ! वाचा याविषयी सविस्तर

मात्र या बैठकीत सकारात्मक चर्चा होऊ शकली नाही. तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्या संघटनेने आपला संप सुरूच राहील अशी भूमिका काल बोलून दाखवली. या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा महसूल मंत्री विखे पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली.

यानंतर मग तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्या संघटनेसोबत महसूल मंत्री यांनी बैठक घेतली आणि नाही तहसीलदार यांचे वेतनश्रेणी चार हजार आठशे रुपये करण्याचे मान्य केले. राज्य शासनाने नाय येत तहसीलदार यांची वेतनश्रेणी चार हजार आठशे रुपये करण्याचा निर्णय घेतल्याचे महसूल मंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आले.

हे पण वाचा :- खुशखबर ! सीआरपीएफ मध्ये होणार तब्बल 1 लाख 30 हजार रिक्त पदांची भरती, ‘या’ दिवशी सुरु होणार अर्ज प्रक्रिया

निश्चितच तहसीलदार संघटनेची मागणी मान्य झाली असल्याने संघटने कडून तात्पुरता हा संप स्थगित करण्यात आला आहे. मात्र 30 एप्रिल पर्यंत याचा शासन निर्णय निर्गमित झाला नाही तर पुन्हा एकदा तहसीलदार आणि नाही तहसीलदार संपावर जाणार आहेत. यामुळे आता शासनाकडून याचा शासन निर्णय केव्हा निर्गमित होतो याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहणार आहे.

निश्चितच राज्यातील नायब तहसीलदार यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा झाली असल्याने हा निर्णय संबंधित कर्मचाऱ्यांच्या हिताचा असून याचे स्वागत होत आहे. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी लवकरात लवकर केली जावी अशी देखील मागणी या निमित्ताने उपस्थित केली जात आहे.

हे पण वाचा :- शेवटी निर्णय झालाच! शिंदे-फडणवीस सरकारने ‘या’ कर्मचाऱ्यांच्या वेतनात केली मोठी वाढ; 1 एप्रिल पासून वेतन वाढीचा निर्णय लागू