अखेर देव पावला ! ‘त्या’ कर्मचाऱ्यांच्या वेतनातील तफावत दूर; अधिसूचना जारी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

State Employee News : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक मोठा निर्णय झाला आहे. पदोन्नत कर्मचाऱ्यांच्या संदर्भात हा निर्णय झाला आहे. या निर्णयाच्या माध्यमातून सरळ सेवा भरतीद्वारे नियुक्त होणारे आणि पदोन्नत कर्मचारी यांच्या वेतनातील जी काही तफावत राहते ती तफावत आता दूर होणार आहे. यासाठी राज्य शासनाने निर्णय घेतला आहे.

राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की अनेकदा विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळत असते मात्र पदोन्नती मिळूनही वेतनाची निश्चिती वेळेत होत नाही. यामुळे पदोन्नती कर्मचाऱ्यांना केवळ पदावर समाधान मानावे लागते. त्या पदासाठी पात्र वेतन त्यांना वेळेत मिळत नाही.

यामुळे सरळ सेवा भरतीच्या माध्यमातून नियुक्त होणारे कर्मचारी आणि पदोन्नत होणारे कर्मचारी यांच्या वेतनातील तफावत दूर करण्याची मागणी खूप जुनी होती. मात्र केंद्र शासनाने 2009 मध्ये एक अधिसूचना काढली होती यामुळे ही तफावत राज्य शासनाला दूर करता येत नव्हती. मात्र आता राज्य शासनाने शुक्रवारी एक महत्त्वाची अधिसूचना जारी केली आहे.

या अधिसूचनेच्या माध्यमातून सरळ सेवा भरतीने नियुक्त होणारे आणि पदोन्नत्य कर्मचारी यांच्यामधील वेतनाची जी काही तफावत राहत होती ती दूर होणार आहे. आता पदोन्नत कर्मचाऱ्यांची वेतनातील तफावत दूर होणार असल्याने याचा मोठा फायदा पदोन्नत कर्मचाऱ्यांना होणार आहे.

नेमका वेतनातील फरक कसा होता

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांना पदोन्नती ही मिळत असते. आता पदोन्नती झाली म्हणजेच त्या संवर्गातील उच्च पद सदर कर्मचाऱ्याला मिळतं शिवाय अशा पदोन्नत्त कर्मचाऱ्यांच्या वेतनात देखील वाढ होण्यापेक्षा असते. सरळसेवेच्या माध्यमातून जे कर्मचारी नियुक्त होतात त्यांच्या प्रमाणेच अशा कर्मचाऱ्यांना वेतन देणे अपेक्षित असते. मात्र आतापर्यंत पदोन्नती प्राप्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना केवळ उच्चपदच मिळत होतं.

वेतनातील तफावत मात्र लवकर दूर होत नव्हती. म्हणजे विविध संवर्गातील ज्या पदोन्नत्त कर्मचाऱ्यांना सरळ सेवेच्या कर्मचाऱ्यांइतके वेतन मिळत नव्हते अशा कर्मचाऱ्यांना आता त्यांच्या इतके वेतन मिळणार आहे. म्हणजेच पदोन्नत कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय दूर होणार आहे. विशेष बाब अशी की, पदोन्नत्त कर्मचाऱ्यांना वेतनाच्या फरकाची रक्कम देखील दिली जाणार आहे.

विविध संवर्गातील, विभागातील सरळ सेवा भरतीच्या माध्यमातून जॉईंट झालेले आणि पदोन्नत झालेले कर्मचाऱ्यांच्या वेतनात जी काही तफावत राहणार आहे आता या निर्णयाच्या माध्यमातून दूर होणार आहे. एक जून 2006 नंतर विविध संवर्गातील पदोन्नती प्राप्त कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाल्यापासून वेतन श्रेणी मधील तफावत आता दूर होणार आहे. निश्चितच अनेक दिवसांपासूनची मागणी अखेर निकाली निघली आहे. यामुळे राज्य शासनातील कर्मचाऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे.

राज्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! जानेवारीपासून वाढणारा महागाई भत्ता 3% नाही तर ‘इतका’ वाढणार, वेतनात होणार मोठी वाढ