राज्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! जानेवारीपासून वाढणारा महागाई भत्ता 3% नाही तर ‘इतका’ वाढणार, वेतनात होणार मोठी वाढ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

State Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ताबाबत एक मोठी अपडेट हाती आली आहे. वास्तविक सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ हा दिला जात असतो. पहिल्यांदा जानेवारी महिन्यात आणि दुसऱ्यांदा जून महिन्यात महागाई भत्ता वाढ ही कर्मचाऱ्यांना अनुज्ञय केली जाते. आम्ही आपणास सांगू इच्छितो की महागाई भत्ता हा कामगार ब्युरोने जारी केलेल्या औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारे मोजला जातो.

म्हणजेच एआयसीपीआयच्या निर्देशांकानुसार महागाई भत्ता हा ठरवला जात असतो. दरम्यान आता डिसेंबर महिन्याचे सीपीआय-आयडब्ल्यूचे निर्देशांक 31 जानेवारी 2023 रोजी समोर आले आहेत. यानुसार आता महागाई भत्त्यात 4.23 टक्के वाढ होणे अपेक्षित आहे. परंतु महागाई भत्त्यात वाढ देताना दशांश स्थानी असलेली किंमत गृहीत धरली जात नाही.

म्हणजे आता सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासून चार टक्के दराने महागाई भत्ता वाढ दिली जाणार आहे. वास्तविक आतापर्यंत अनेक जाणकार लोकांनी डिसेंबर महिन्यात निर्देशांकामध्ये मोठा उलटफेअर होणार नाही आणि सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासून केवळ तीन टक्के दराने महागाई भत्ता वाढ अनुज्ञेय होईल असं सांगितलं होतं. परंतु आता डिसेंबर 2022 महिन्याचे निर्देशांकाची आकडेवारी समोर आली असून चार टक्के एवढा महागाई भत्ता वाढ सरकारी कर्मचाऱ्यांना दिला जाण्याची शक्यता आहे.

म्हणजेचं सध्या स्थितीला कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता मिळत असून जानेवारी महिन्यापासून 42 टक्के दराने महागाई भत्ता हा मिळणार आहे. याबाबत ऑल इंडिया रेल्वेमेन फेडरेशनचे सरचिटणीस शिव गोपाल मिश्रा यांनी सविस्तर माहिती दिली आहे. शिव गोपाल मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, डीएवाढीचा हा सदर प्रस्ताव अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागाकडून तयार केला जाणार आहे.

यामध्ये त्याचा महसूल परिणाम देखील नमूद केला जाणारा असल्याची माहिती या ठिकाणी त्यांनी दिली. यानंतर हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. अशा पद्धतीने केंद्रीय मंत्रालय या प्रस्तावाला मंजुरी देईल आणि मग जानेवारी महिन्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता मिळेल. मार्चमध्ये या महागाई भत्त्याची घोषणा होईल मात्र प्रत्यक्षात हा महागाई भत्ता जानेवारी महिन्यापासून लागू होईल.

एकंदरीत जर चार टक्के डीए वाढ झाली तर कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ होणार आहे. एखाद्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार जर 25000 असेल तर त्या कर्मचाऱ्यांच्या पगारात महिन्याकाठी एक हजार रुपयाची वाढ होणार आहे. म्हणजेच बारा हजाराची वार्षिक वाढ सदर कर्मचाऱ्याला मिळणार आहे. निश्चितच कर्मचाऱ्यांसाठी ही एक दिलासादायक अशी बातमी आहे.

दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ लागू झाल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांना देखील महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जातो. यामुळे महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना देखील लवकरच महागाई भत्ता वाढीचा लाभ हा मिळणार आहे.

कर्मचाऱ्यांसाठी कामाची बातमी ! महागाई भत्ता ठरवण्यासाठी कोणता फॉर्मुला वापरला जातो ?