कौतुकास्पद! सरकारी कर्मचाऱ्यांचा शेतकऱ्यांना मदतीचा हात; अवकाळी पावसाने नुकसानग्रस्तांना कर्मचारी अशी करणार मदत, वाचा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

State Employee News : जय जवान जय किसान अस आपण नेहमी म्हणत असतो. सीमेवर भारत मातेचे रक्षण करणाऱ्या जवानांचा आणि सीमेच्या आत गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत, लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचीच पोटाची खळगी भरणाऱ्या शेतकऱ्यांचा जय व्हावा म्हणून आपण ही घोषणा मोठ्या गर्वाने देत असतो.

मात्र बळीराजावर सर्वांच्या पोटाची खळगी भरता-भरता उपासमारीची वेळ आली आहे. निसर्गाचे दुष्टचक्र शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. यामुळे अख्या जगाचे पोट भरणाऱ्या बळीराजाला मदतीच्या हाताची गरज आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी एक मदतीचा हात पुढे केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अवकाळी पावसाने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेले सरकारी कर्मचारी जून महिन्यातील आपला एका दिवसाचा पगार शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

हे पण वाचा :- यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन पिकाला ‘हे’ एक खत द्या उत्पादनात होणार विक्रमी वाढ, वाचा….

खरंतर राज्य शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांना अवकाळी पावसाने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून एका दिवसाचे वेतन देण्याचे आवाहन केले होते. आता या आवाहानाला सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सकारात्मक प्रतिसाद दिला जाणार असून सरकारी कर्मचारी जून महिन्यातील आपला एका दिवसाचा पगार शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये जमा करणार असल्याची बातमी समोर येत आहे.

याआधी महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाच्या अधिकाऱ्यांनीही अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला होता. या अधिकाऱ्यांनी आपले एका दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले आहे. अवकाळीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी हा निधी देण्यात आला आहे. 

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर! भात पिकासाठी ‘या’ कंपनीने विकसित केलं पावरफुल तणनाशक, शेतकऱ्यांच्या खर्चात होणार मोठी बचत, वाचा…

खरंतर एप्रिल महिन्यातच हा निर्णय घेण्यात आला होता. आता राजपत्रित अधिकाऱ्यांच्या या निर्णयानंतर राज्य शासनाने राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जून महिन्यातील आपला एका दिवसाचा पगार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये जमा करण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान या आवाहानाला राज्य कर्मचाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला असल्याची माहिती समोर आली असून जून महिन्याचा एका दिवसाचा पगार हे कर्मचारी आता मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये जमा करतील अशी शक्यता आता व्यक्त केली जात आहे.

निश्चितच कर्मचाऱ्यांनी जर जून महिन्यातील एका दिवसाचा पगार शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला तर शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी दिलासादायक बातमी राहणार असून कर्मचाऱ्यांची संवेदनशीलता यामधून पुन्हा एकदा अधोरेखित होणार एवढे नक्की. 

हे पण वाचा :- अहमदनगरच्या शेतकरी पुत्रांनी करून दाखवलं ! सात महिन्यांची मेहनत घेऊन शेतकऱ्यांसाठी तयार केलं अद्भुत यंत्र, वाचा…