Successful Farmer : कौतुकास्पद ! प्रयोगशील शेतकऱ्याने विपरीत परिस्थितीवर मात करत पेरूच्या बागेतून मिळवले लाखोंचे उत्पन्न, वाचा ही यशोगाथा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Successful Farmer : भारतीय शेतीमध्ये बदलत्या काळात मोठा बदल होत आहे. आता पारंपारिक पिकांची शेती न करता शेतकरी बांधव फळबाग पिकांच्या लागवडीकडे वळले आहेत. विशेष म्हणजे यातून शेतकऱ्यांना चांगली काम आहे. लातूर जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने देखील फ़ळबाग शेतीतून लाखोंची कमाई करून दाखवली आहे.

लातूर तालुक्यातील तांदुळजा येथील एका प्रयोगशील शेतकरी कुटुंबाने 40 गुंठे शेतजमिनीत पेरूची बाग लागवड करून तब्बल पाच लाखांची कमाई करण्याची किमया साधली आहे. मौजे तांदुळजा येथील काशिनाथ नवगिरे व कुटुंबाने ही उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली आहे. खरं पाहता नवगिरे यांचा अडकिते बनवण्याचा पारंपारिक व्यवसाय. या व्यवसायामुळे आणि शेतीसाठी कमी पाणी उपलब्ध असल्यामुळे शेतीकडे त्यांनी पाठ फिरवली होती.

मात्र काळाच्या ओघात त्यांचा पारंपारिक व्यवसाय डबघाईला आला. अशा परिस्थितीत नवगिरे कुटुंबाने पुन्हा एकदा शेती सूरु केली आहे. काशीनाथ नवगिरे यांना एकूण सात एकर शेत जमीन असून दोन मुले आहेत. अजित आणि अशोक नवगिरे अशी त्यांची नावे. विशेष म्हणजे अजित हे पेशाने शिक्षक आहेत तर अशोक यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले आहे. दरम्यान आता म्हणजे त्यांनी आपली नोकरी सांभाळत शेतीकडेही लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.

या अनुषंगाने 2020 मध्ये नवगिरे कुटुंबाने आपल्या एक एकर शेत जमिनीत तैवान जातीची पेरूची बाग लावली. एका एकरात 870 पेरूची झाडे लागली. पाणी कमी असल्याने त्यांनी ठिबक सिंचन प्रणालीच्या माध्यमातून पिकांना पाणी देण्याची सोय केली. पाण्याचा प्रश्न मिटला मात्र पेरू बागेवर फळमाशीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला.

आता यावर उपाय म्हणून त्यांनी कुक्कुटपालनाची जोड घेतली. त्यांनी एकूण २०० कोंबड्या विकत आणल्या. कोंबड्यांच्या संगोपनासाठी त्यांनी बागेजवळच शेड निर्माण केले. सकाळी शेडचे दार उघडले की कोंबड्या बागेत धावतात आणि सायंकाळी पुन्हा शेडमध्ये परततात. त्यामुळे फळबागेतील फळमाशी, तण नष्ट करण्यासाठी कोंबड्यांची मदत होत आहे.

यामुळे, खुरपणी, फळमाशीसाठीच्या खर्चात बचत झाली. फळमाशी नष्ट झाल्याने बाग पुन्हा बहरली असल्याचे नवगिरे कुटुंबाने सांगितले. शिवाय कोंबडीपासून मिळणाऱ्या अंड्यातून अतिरिक्त उत्पन्न देखील त्यांना मिळत आहे. निश्चितच चाळीस गुंठे म्हणजे एक एकर शेत जमिनीत पाच लाखांचे कमाई करत नवगिरे कुटुंबांनी इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक काम केल आहे.

विशेष म्हणजे फळमाशी पासून पेरूची बाग सुरक्षित करण्यासाठी त्यांनी जो काही कुक्कुटपालनाचा निर्णय घेतला आहे त्यामुळे त्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळत आहे. एकंदरीत काळाच्या ओघात शेतीमध्ये असा प्रयोग करणे आता आवश्यक झाले आहे.