दिलासादायक ! ऊस उत्पादकांना ‘या’ साखर कारखान्यांनी दिली 100 टक्के एफआरपी; पहा कारखान्यानुसार किती एफआरपी रक्कम झाली वितरित अन किती आहे थकीत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sugarcane Farming : उस हे राज्यात उत्पादित होणारे बहुवार्षिकी पीक आहे. या पिकाची राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक शेती केली जाते. गेल्या ऊस हंगामात मात्र अतिरिक्त उसाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. शिवाय एकरकमी एफआरपीचा मुद्दा देखील मोठा गाजला होता. या हंगामात मात्र अतिरिक्त उसाचा प्रश्न ऐरणीवर येणार नसल्याचे चित्र आहे.

विशेष म्हणजे आता ऊस हंगाम अंतिम टप्प्यात आला असून वेळेतच यंदाचा ऊस हंगाम आटोपला जाणार आहे आणि सर्व ऊस उत्पादकांचे ऊस गाळप होणार आहेत. मात्र एक रकमी एफ आर पी चा प्रश्न अद्याप निकाली निघाला नसल्याचा चित्र आहे. कारण की राज्यातील बहुतांशी साखर कारखान्यांनी अद्याप शेतकऱ्यांना संपूर्ण एफ आर पी ची रक्कम वर्ग केलेली नाही.

तर काही कारखान्यांनी मात्र शंभर टक्के एफ आर पी ची रक्कम संबंधी शेतकऱ्यांना देऊ केली आहे. दरम्यान आज आपण कोल्हापूर विभागातील कोणत्या साखर कारखान्यांनी पूर्ण एफ आर पी त्यांच्या सभासद शेतकऱ्यांना देऊ केली आहे आणि कोणत्या साखर कारखान्यांनी पूर्ण एफ आर पी दिलेली नाही तसेच एफ आर पी किती दिली आहे याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.

कोल्हापूर विभागातील कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यातील एकूण 19 साखर कारखान्यांनी आपल्या शेतकऱ्यांना शंभर टक्के एफ आर पी दिली आहे. यामध्ये कोल्हापूरच्या 10 आणि सांगलीच्या नऊ साखर कारखान्यांचा समावेश आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की कोल्हापूर विभागात कोल्हापूर जिल्ह्यातील 15 सहकारी आणि सहा खाजगी साखर कारखान्यात गाळप हंगाम सुरू आहे. तसेच सांगली जिल्ह्यात दहा सहकारी आणि तीन खाजगी साखर कारखान्यात गाळप सुरू आहे. म्हणजेच विभागात एकूण 34 साखर कारखान्यांमध्ये या हंगामात गाळप सुरू आहे.

या 34 साखर कारखान्यांमध्ये जानेवारी महिन्यापर्यंत एक कोटी 73 लाख 11 हजार 991 टन उसाचे गाळप झाले आहे. या उसाच्या एफ आर पी पोटी संबंधित शेतकऱ्यांना 5 हजार 68 कोटी 17 लाख रुपये देणे अपेक्षित आहे. मात्र यापैकी 4630 कोटी 68 लाख रुपये इतकीच एफ आर पी या 35 साखर कारखान्यांच्या माध्यमातून संबंधित शेतकऱ्यांना देऊ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मात्र एकोणवीस साखर कारखान्यांनी 100% एफआरपी संबंधित शेतकऱ्यांना दिली आहे. आता आपण कारखाना निहाय किती टक्के एफ आर पी वितरित झाली आहे याची माहिती जाणून घेऊया.

कोल्हापूर जिल्हा साखर कारखानानुसार वितरित झालेली एफआरपी :-

  • आजरा, गवसे 82%
  • भोगावती परिते 44%
  • छत्रपती राजाराम कसबा बावडा 85%
  • छत्रपती शाहू महाराज कागल शंभर टक्के
  • दत्त शिरोळ शंभर टक्के
  • दूधगंगा वेदगंगा बिद्री 77%
  • जवाहर हुपरी 100%
  • सदाशिव मंडलिक 81%
  • कुंभी कासारी कुडित्रे 83%
  • पंचगंगा इचलकरंजी 85 टक्के
  • शरद नरंदे 100%
  • तात्यासाहेब कोरणे वारणा 100%
  • अथणी शुगर बांबवडे 100%
  • डी वाय पाटील असळज 86%
  • दालमिया असुर्ले पोर्ले 100%
  • गुरुदत्त शुगर टाकळीवाडी 86 टक्के
  • इकोकेन एनर्जी माळुंगे 100%
  • ओलम ऍग्रो राजगोळी खुर्द 82%
  • संताजी घोरपडे बेलेवाडी काळमा 85 टक्के
  • अथणी शुगर तांबाळे शंभर टक्के
  • अथर्व इंटर ट्रेड दौलत 100%

सांगली जिल्हा साखर कारखाना नुसार वितरित झालेली एफ आर पी

  • हुतात्मा वाळवा 67%
  • राजारामबापू पाटील युनिट नंबर एक साखराळे 100%
  • राजारामबापू पाटील युनिट नंबर दोन वाटेगाव शंभर टक्के
  • राजारामबापू पाटील युनिट नंबर तीन कारंदवाडी शंभर टक्के 
  • राजारामबापू पाटील युनिट नंबर चार जत 100%
  • सोनहिरा वांगी 100%
  • दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड वसंतदादा सांगली 69 टक्के
  • विश्वासराव नाईक चिखली 100%
  • क्रांती अग्रणी जी डी बापू लाड कुंडल 69 टक्के
  • मोहनराव शिंदे आरग शंभर टक्के
  • निनाई देवी दालमिया करुंगळी 100%
  • सद्गुरु श्री श्री राजेवाडी 68%
  • उदगीर शुगर बामणी 100%