उन्हाळी हंगामात सूर्यफुलाच्या ‘या’ वाणाची लागवड करा, 35 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळणार!

Published on -

Sunflower Variety : राज्यातील शेतकऱ्यांसाठी तेलबिया पिकांमध्ये सूर्यफूल (सनफ्लॉवर) हे एक महत्त्वाचे पीक मानले जाते. कमी कालावधीत तयार होणारे, दुष्काळ सहनशील आणि चांगला बाजारभाव मिळणारे पीक म्हणून सूर्यफुलाची ओळख आहे.

कृषी विद्यापीठे व संशोधन संस्थांनी विकसित केलेले विविध उन्नत वाण शेतकऱ्यांना अधिक उत्पादन आणि जास्त तेल टक्केवारी देण्यास सक्षम ठरत आहेत.

या जातीपासून मिळणार विक्रमी उत्पादन 

फुले उन्नती वाण 120 ते 125 दिवसांत तयार होतो. हेक्टरी 30 ते 35 क्विंटल उत्पादन मिळते. यात तेल प्रमाण 52 टक्के असते. दाणे काळे असतात. स्पोडोप्टेरा अळी, तांबेरा तसेच पानांवरील ठिपके व खोडकुज रोगांना मध्यम प्रतिकारक आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा वाण शिफारस करण्यात आला आहे.

एस. बी. 11 – हा 115 ते 120 दिवसांचा वाण असून 15 ते 20 क्विंटल उत्पादन देतो. पाण्याच्या ताणास सहनशील असलेला हा वाण सुमारे 48.22 टक्के तेल देतो. ज. एल.-409 हा 110 ते 115 दिवसांचा वाण असून 30 ते 32 क्विंटल उत्पादन क्षमता आणि 49 टक्के तेल प्रमाण आहे. मराठवाडा, विदर्भासाठी उपयुक्त.

टी. जी.-24, टी. जी.-26 – या जातीची हेक्टरी 25 – 30 क्विंटल उत्पादन क्षमता आहे. उभ्या वाणाची रचना असल्यामुळे लागवड सुलभ ठरते.

ज. एल.-756 (फुले भारती) – हा वाण उत्तर महाराष्ट्रासाठी शिफारस करण्यात आला आहे.

ज. एल.-286 (फुले उमर) आणि टी. पी. जी.-41 – हे वाण पश्चिम महाराष्ट्र, जळगाव, धुळे व अकोला जिल्ह्यांसाठी उपयुक्त आहेत. यामध्ये तेल प्रमाण 45 ते 50 टक्क्यांपर्यंत आढळते.

केडीजी-160 (फुले चेतन्य) – हा वाण आंध्र प्रदेश, तेलंगणा व तामिळनाडूसाठी उपयुक्त असून खोडकुज व पानांवरील ठिपके रोगास मध्यम प्रतिकारक आहे.

कृषी तज्ज्ञांच्या मते, योग्य वाणाची निवड, वेळेवर पेरणी व संतुलित खत व्यवस्थापन केल्यास सूर्यफुलापासून शेतकऱ्यांना निश्चितच अधिक उत्पादन आणि चांगला आर्थिक फायदा मिळू शकतो. तेलबियांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर हे वाण शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News