लाडक्या बहिणींसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेच्या संदर्भात एक मोठे आश्वासन दिले आहे.

Published on -

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरवात गेल्या वर्षी झाली. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. जुलै 2024 पासून या योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा केले जात असून आत्तापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना एकूण 11 हप्ते देण्यात आले आहेत.

महत्त्वाची बाब अशी की, येत्या काही दिवसांना या योजनेच्या पात्र महिलांना बारावा हफ्ता सुद्धा मिळणार आहे. अशातच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहिण योजनेच्या बाबत एक महत्वाचे विधान केले आहे. खरंतर, निवडणुकीच्या काळात महायुतीने लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जातील असे वचन दिले होते. सरकार स्थापित झाल्यानंतर याबाबतचा निर्णय घेतला जाईल असेही महायुतीच्या अनेक नेत्यांनी स्पष्ट केले होते. मात्र आता सरकार स्थापित होऊन सहा महिन्यांपेक्षा अधिकचा वेळ झाला आहे.

पण तरीही या संदर्भातील सकारात्मक निर्णय होऊ शकलेला नाही. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबाबत महायुती सरकारकडून कोणतीच घोषणा झालेली नसल्याने लाडक्या बहिणींमध्ये थोडीशी नाराजी पाहायला मिळत आहे. मात्र अखेरकार आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांची भूमिका काय

मुख्यमंत्री फडणवीस यांनी असे सांगितले आहे की, लाडकी बहिण या शासनाच्या महत्त्वकांक्षी योजनेतील पात्र महिलांना 2100 रुपये कधी मिळणार? असं विचारलं जात आहे. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, जे आमच्या जाहिरनाम्यामध्ये आम्ही सांगितलं आहे ते आम्ही नक्कीच करणार आहोत. आता आपली अर्थव्यवस्था सुद्धा वाढत आहे. हळूहळू परिस्थिती चांगली होत जाईल आणि तेव्हा लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जातील. आम्ही जाहीरनाम्यात दिलेली आश्वासनं पूर्ण करणार आहोत, मात्र एकदाच सगळी पूर्ण करणे शक्य नाही. पण, दिलेले आश्वासन नक्कीच पूर्ण केले जातील असे आश्वासन यावेळी पुन्हा फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आले आहे.

जूनचा हफ्ता कधी मिळणार

जून महिन्याचा बारावा हप्ता जून अखेरपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होईल असे म्हटले जात होते. मात्र सध्याची परिस्थिती पाहता जूनचा हप्ता पुढील महिन्यात म्हणजे जुलै महिन्यात जमा होऊ शकतो. मे महिन्याचा हप्ता देखील जून महिन्यात जमा करण्यात आला होता आणि आता जून महिन्याचा हफ्ता जुलैमध्ये जमा होण्याची शक्यता आहे. तथापि याची अधिकृत तारीख अजूनही सरकारकडून जाहीर करण्यात आलेली नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!