शेतकऱ्यांसाठी अतिशय फायद्याचा ठरेल ‘हा’ ट्रॅक्टर! कमी डिझेलमध्ये शेतीचे होईल जास्तीत जास्त काम, वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये

पीक लागवडीच्या अगोदर शेतीची तयारी करण्यासाठी देखील ट्रॅक्टरचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो व पिक लागवड, पिकांची आंतरमशागत आणि पीक काढण्यासाठी आवश्यक ट्रॅक्टर चलीत यंत्रे चालवण्यासाठी देखील ट्रॅक्टर वापरले जाते.

Ajay Patil
Published:
swaraj 744 xt tractor

Swaraj 744 XT Tractor:- शेतीमध्ये यांत्रिकीकरण आता मोठ्या प्रमाणावर होऊ लागले असून शेतीमध्ये बहुतेक महत्त्वाच्या कामांसाठी आता यंत्रांचा वापर होऊ लागला आहे.शेतीमध्ये अनेक ट्रॅक्टरचलीत यंत्रे विकसित झाल्यामुळे कमीत कमी वेळेमध्ये शेतीची अनेक अवघड कामे आता शक्य झाले आहेत.

पीक लागवडीच्या अगोदर शेतीची तयारी करण्यासाठी देखील ट्रॅक्टरचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो व पिक लागवड, पिकांची आंतरमशागत आणि पीक काढण्यासाठी आवश्यक ट्रॅक्टर चलीत यंत्रे चालवण्यासाठी देखील ट्रॅक्टर वापरले जाते.

सगळ्यात सोप्या भाषेत सांगायचे म्हटले म्हणजे ट्रॅक्टर शिवाय आता शेती शक्यच नाही असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही व त्यामुळे जाता शेतकरी देखील मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टर खरेदी करतात.

परंतु ट्रॅक्टर खरेदी करताना मात्र कमीत कमी डिझेलमध्ये जास्तीत जास्त ट्रॅक्टर चालवता येईल किंवा जास्तीत जास्त शेतातील काम करता येईल असे ट्रॅक्टर खरेदी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो.

बाजारपेठेमध्ये अनेक ट्रॅक्टर उत्पादक कंपन्यांची चांगली ट्रॅक्टर उपलब्ध असल्याने ट्रॅक्टर निवडीमध्ये शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडतो. या अनुषंगाने तुम्हाला जर ट्रॅक्टर खरेदी करायची असेल तर आपण या लेखामध्ये अशाच एका महत्त्वाच्या ट्रॅक्टरची माहिती थोडक्यात घेणार आहोत.जे ट्रॅक्टर कमीत कमी इंधनामध्ये जास्तीत जास्त काम करते व शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर खूप फायद्याचे ठरते.

स्वराज्य 744 एक्सटी ट्रॅक्टर ठरवेल शेतकऱ्यांसाठी फायद्याचे
मागील दहा ते पंधरा वर्षापासून जर बघितले तर ट्रॅक्टर बाजारपेठेत स्वराज्य कंपनीच्या विविध ट्रॅक्टर मॉडेल्सने ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. यामध्ये जर आपण स्वराज्य 744 XT हे ट्रॅक्टर बघितले तर हे एक अवघड कामांसाठी उत्कृष्ट परफॉर्मन्स असणारे ट्रॅक्टर मानले जाते.

हे एक उच्च कार्यक्षमता आणि शेतीसाठी फायद्याचे ट्रॅक्टर म्हणून ओळखले जाते व त्यामुळे शेतकऱ्यांच्या व्यावसायिक शेती व शेती व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यासाठी ट्रॅक्टरचा खूप मोठा फायदा होतो. या ट्रॅक्टरची इंजिन क्षमता देखील उत्कृष्ट आहे व मायलेज देखील उत्तम आहे.

त्यामुळे हे ट्रॅक्टर उच्च इंधनक्षमता प्रदान करते व यामुळे शेतकऱ्यांच्या पैशांची बचत होण्यास मदत होते. स्वराज 50 एचपी ट्रॅक्टर शक्तिशाली आणि इंधन कार्यक्षम इंजिन सह सुसज्ज आहे. हे ट्रॅक्टर उच्च कार्यक्षमता तसेच कमीत कमी इंधनाचा वापर व आरामदायी ड्रायविंग तसेच कार्यक्षम ब्रेकिंग सिस्टम त्यामुळे इतर ट्रॅक्टरांपेक्षा सरस असे ट्रॅक्टर आहे.

त्यामुळे आरामदायी ड्रायव्हिंग आणि सुरक्षितता या दोन्ही दृष्टिकोनातून हे ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी फायद्याचे आहे. तसेच हवामान व माती इत्यादी सर्व आव्हानांना सहजपणे तोंड देण्याची क्षमता या ट्रॅक्टरमध्ये आहे.त्यामुळे कमीत कमी डिझेलमध्ये जास्तीत जास्त कामे हे ट्रॅक्टर करत असल्यामुळे शेतकऱ्यांना पैशांच्या बचतीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असे ट्रॅक्टर आहे.

किती आहे स्वराज्य 744 एक्सटी ट्रॅक्टरची किंमत?
भारतीय ट्रॅक्टर बाजारपेठेमध्ये स्वराज्य 744 XT ट्रॅक्टरची किंमत सहा लाख 90 हजार ते सात लाख 40 हजार रुपये पर्यंत आहे. त्यामुळे कमीत कमी शेती असलेल्या शेतकऱ्यांना देखील सहजपणे हे ट्रॅक्टर खरेदी करता येणे शक्य आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe