Gold-Silver Rate: सोने-चांदीच्या दरात आज मोठा उलटफेर! भावात झाली तब्बल इतकी घसरण, वाचा सोने-चांदीचे आजचे दर

Ajay Patil
Published:
gold-silver rate

Gold-Silver Rate:- गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होताना आपल्याला दिसून येत आहे. कधी नव्हे एवढे सोने आणि चांदीच्या दराने उच्चांकी पातळी गाठली असून सोने चांदीची खरेदी ही सर्वसामान्य लोकांच्या आवाका बाहेर गेल्याचे सध्या चित्र आहे.

या पार्श्वभूमीवर जर आपण 3 जून म्हणजेच आजचे सोन्या आणि चांदीचे दर पाहिले तर त्यामध्ये मोठी घसरण पाहायला मिळत असून चांदी ही 3499 रुपये प्रति किलो याप्रमाणे स्वस्त झाली आहे तर सोने देखील 951 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

 सोने चांदीच्या दरात मोठी घसरण

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये आज मोठी घसरण पाहायला मिळत असून आयबीजेए अर्थात इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन नुसार 24 कॅरेट सोन्याचे दर आज 951 रुपयांनी स्वस्त होऊन 71405 रुपयांवर आले

आहेत. तर चांदीचे दर आज 3499  प्रति किलोमागे घसरले असून चांदी आज ८८९५० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. जर आपण कालचा चांदीचा भाव पाहिला तर तो 92449 रुपये प्रति किलो इतका होता.

 मुंबई सह देशातील चार प्रमुख शहरांमधील सोन्याचे भाव

1- दिल्ली देशाची राजधानी दिल्ली येथे 22 कॅरेट सोन्याची किंमत 66 हजार 250 रुपये प्रति दहा ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 72 हजार 260 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.

2- मुंबई महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात आज 22 कॅरेट दहा ग्राम सोन्याची किंमत 66 हजार 100 रुपये आणि दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 72 हजार 110 रुपये आहे.

3- कोलकाता कोलकाता येथे दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याची किंमत 66 हजार 100 रुपये तर 24 कॅरेट दहा ग्राम सोन्याची किंमत 72 हजार 110 रुपये इतकी आहे.

4- चेन्नई शहरामध्ये आज 22 कॅरेट दहा ग्रॅम सोन्याची किंमत 66,660 रुपये आहे तर 24 कॅरेटच्या दहा ग्राम सोन्याची किंमत 72 हजार 720 रुपये इतकी आहे.

5- भोपाल भोपाल या ठिकाणी आज दहा ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 66 हजार 150 रुपये आहे तर 24 कॅरेट सोन्याची किंमत दहा ग्रॅम करिता 72 हजार 160 रुपये इतकी आहे.

यावर्षी आतापर्यंत सोन्यात झाली 8000 रुपयांनी वाढ

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन नुसार यावर्षी सोन्याच्या किमतींमध्ये आतापर्यंत आठ हजार 53 रुपये वाढ झाली असून एक जानेवारी रोजी सोन्याचे भाव 63 हजार 352 रुपये होते व आता साधारणपणे 71 हजार चारशे पाच रुपये प्रति दहा ग्रॅम वर पोहोचले आहेत. तसेच चांदीच्या दरात देखील चांगली वाढ झाली असून चांदीचा भाव 73 हजार 395 वरून 88 हजार 950 रुपयांवर पोहोचला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe