‘ही’ आहेत महाराष्ट्रातील टॉप 10 सरकारी इंजीनियरिंग कॉलेज ! इथं ऍडमिशन मिळाल्यास तुमच भविष्य होणार उज्वल

तुम्हाला इंजीनियरिंगला ऍडमिशन घ्यायचे आहे का मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. कारण की, आज आपण राज्यातील टॉप 10 सरकारी इंजिनिअरिंग कॉलेजची माहिती पाहणार आहोत.

Published on -

Top Engineering Colleges : तुम्हीही बारावी सायन्स नंतर इंजीनियरिंगला प्रवेश घेण्याच्या तयारीत आहात का ? मग तुमच्यासाठी आजची बातमी विशेष फायद्याची राहणार आहे. खरंतर नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. पाच मे 2025 रोजी राज्य बोर्डाचा एचएससीचा निकाल जाहीर झाला असून आता विद्यार्थी पुढील प्रवेशासाठी लगबग करत आहेत.

बारावी सायन्स उत्तीर्ण झालेले अनेक विद्यार्थी मेडिकल आणि इंजीनियरिंगला ऍडमिशन घेण्याच्या तयारीत आहेत दरम्यान जर तुम्हीही इंजीनियरिंग ला ऍडमिशन घेण्याच्या तयारीत असाल तर आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील टॉप 10 सरकारी इंजीनियरिंग कॉलेज ची माहिती सांगणार आहोत.

आज आपण ज्या कॉलेजची माहिती पाहणार आहोत त्यामध्ये MHT CET या प्रवेश परीक्षेच्या गुणांच्या आधारावर प्रवेश मिळतो. खरेतर MHT CET म्हणजे महाराष्ट्र कॉमन एन्ट्रन्स टेस्ट ही महाराष्ट्रातील एक अत्यंत स्पर्धात्मक अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा आहे, जी राज्यातील प्रमुख सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याचे उद्दिष्ट ठेवणाऱ्या इच्छुकांसाठी एक प्रमुख प्रवेशद्वार म्हणून काम करते.

एमएचटी सीईटी स्कोअरच्या आधारे अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी, उमेदवारांना प्रथम एमएचटी सीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे आणि वैध गुण मिळवणे आवश्यक आहे.

त्यानंतर त्यांना सीट वाटपासाठी सेंट्रलाइज्ड अॅडमिशन प्रोसेस (सीएपी) फेऱ्यांसाठी नोंदणी करावी लागेल. सीट वाटप प्रक्रियेदरम्यान सीट उपलब्धता, श्रेणी-विशिष्ट कट-ऑफ आणि एमएचटी सीईटी स्कोअर पण विचारात घेतला जाईल.

MHT CET स्कोर स्वीकारणारे महाराष्ट्रातील टॉप 10 सरकारी कॉलेज

1) इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी आयसीटी मुंबई

2) COEP टेक्नॉलॉजीकल यूनिवर्सिटी पुणे

3) वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजीकल इन्स्टिट्यूट मुंबई

4) युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, कवयित्री बहिणाबाई चौधरी, जळगाव 

5) गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, कराड

6) गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजीनियरिंग औरंगाबाद

7) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी नागपूर

8) लक्ष्मीनारायण इनोव्हेशन टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी नागपूर

9) SNDT वूमन्स युनिव्हर्सिटी मुंबई

10) गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजीनियरिंग चंद्रपूर

या कॉलेजही आहेत बेस्ट

वर सांगितलेल्या दहा कॉलेजेस व्यतिरिक्त महाराष्ट्रात इतरही काही सरकारी कॉलेज आहेत ज्या की एमएचटी-सीईटी चा स्कोर एक्सेप्ट करतात. 

श्री गोविंद सिंह जी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी विष्णुपुरी

गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजीनियरिंग जळगाव

गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अमरावती

गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च पुणे

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी लोणेरे 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!