Tur Rate Increase : सध्या बाजारात शेतमालाला अपेक्षित असा भाव मिळत नसल्याने राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. कापूस, सोयाबीन तसेच कांदा या नगदी पिकांना अतिशय कवडीमोल दर मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतीतून फारसे उत्पन्न मिळणार नाही असे चित्र यंदा तयार झाले आहे. मात्र अशा परिस्थितीतच शेतकऱ्यांसाठी एक गोड बातमी समोर येत आहे.
ती म्हणजे तुरीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून भरघोस वाढ होत आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी झालेल्या लिलावात तुरीला 8650 रुपये प्रति क्विंटल इतका बाजार भाव मिळाला आहे. तर गुरुवारी झालेल्या लिलावात तुर 8905 रुपये प्रति क्विंटल या दरात विक्री झाली आहे.
वास्तविक यंदा तूर उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. शिवाय सध्या राज्यात लग्न सराईचा हंगाम सुरु आहे. अशा परिस्थितीत तुरीची मागणी बाजारात मोठ्या प्रमाणात वधारली आहे. उत्पादनात घट झालेली असल्याने मागणी मात्र पूर्ण होत नाहीये. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने सध्या बाजारात तुरीला चांगला दर मिळत आहे.
बाजारात तुरीची आवक खूपच कमी असून दरवाढ होत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. अशातच शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे तुरीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. उत्पादनात घट आणि वाढलेली मागणी पाहता येत्या काही दिवसात तुरीचे दर 9 हजार रुपये प्रतिक्विंटलचा टप्पा पार करतील असा दावा जाणकार लोकांनी केला आहे.
हे पण वाचा :- शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; या लोकांना घर बांधण्यासाठी ‘इतकी’ ब्रास वाळू मिळणार फ्री, पहा…..
तुर दरवाढीचे कारण
गेल्या हंगामात तुरीला अपेक्षित असा भाव मिळाला नसल्याने महाराष्ट्रासह जवळपास सर्वच राज्यात तुरीची लागवड कमी झाली. लागवड कमी त्यातच या हंगामात अतिवृष्टीचे सावट होते. परिणामी तुरीच्या उत्पादनात देखील मोठी घट झाली आहे. अतिवृष्टीमुळे तुर पिकाला मोठा फटका बसला असून एकरी उत्पादनात घट आली आहे.
या अशा परिस्थितीत मागणी देखील गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक असल्याचे सांगितले जात आहे. हेच कारण आहे की, तुरीच्या दरात चांगली तेजी आली असून तुरीचे दर जवळपास 9 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले आहेत.
हे पण वाचा :- समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरविरपर्यंतच्या 80 किलोमीटरचे काम पूर्ण; ‘या’ दिवशी खुला होणार हा मार्ग, पहा……
सध्या अकोला एपीएमसी मध्ये तुरीचे दर 8900 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले आहेत. राज्यातील इतरही बाजारात तुरीचे कमाल बाजारभाव साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहचले आहेत. सरासरी बाजार भाव देखील आठ हजाराच्या घरात आहेत.
दरम्यान आता तुरीच्या दरात वाढ होणार असून 9 हजाराचा टप्पा तुर पार करेल असा विश्वास जाणकारांनी व्यक्त केला आहे. निश्चितच बाजारातील ही परिस्थिती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे आणि यामुळे तुर उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान देखील स्पष्टपणे पहावयास मिळत आहे.
हे पण वाचा :- अहमदनगर, पुणे सातारा, नाशिक, कोल्हापूर अन ‘त्या’ जिल्ह्यात पुढील पाच दिवस पडणार मुसळधार पाऊस, येलो अलर्ट जारी