चमत्कार झाला ! गाईने दिला ‘सिंहाच्या बछड्याला’ जन्म; बछड्याला पाहण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी, पहा Photo

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Viral News : जगात अशा काही अविश्वसनीय घटना घडतात ज्या ऐकून, पाहून डोळ्यावर विश्वास बसत नाही. अशा घटनांना काही लोक चमत्काराची उपमा देतात तर संशोधक अशा घटनांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहत असतात. पण मध्यप्रदेशातून एक अशी जगावेगळी घटना समोर आली आहे ज्यावर विश्वास ठेवणे थोडे अवघड बनले आहे.

शिवाय या घटनेवर विज्ञानात देखील काहीच उत्तर नाही. आता घटना आहे ज्यात सायन्स देखील मात खात आहे. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, मध्य प्रदेश मध्ये घाईने चक्क सिंहाच्या बछड्याला जन्म दिला आहे. आता हे ऐकून तुम्हाला खरं पटणार नाही.

हे पण वाचा :- धक्कादायक ! आता ‘या’ कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे मानधन रखडले, कर्मचारी पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात

पण मध्य प्रदेश राज्यातील रायसेन जिल्ह्यातील बेगमगंज येथील गोरखा गावातील एका शेतकऱ्याच्या गाईने चक्क सिंहाच्या बछड्यासारख्या दिसणाऱ्या वासराला जन्म दिला आहे. नथुलाल शिल्पकर या शेतकऱ्याच्या गाईने या अनोख्या वासराला जन्म दिला आहे. याचे फोटो देखील सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले आहेत.

आजूबाजूच्या पंचक्रोशीत या अनोख्या वासरू बाबत वेगाने माहिती पसरली अन हे अनोखे वासरू पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची तोबा गर्दी या शेतकऱ्याच्या घरी पाहायला मिळाली आहे. पण दुर्दैवाने हे वासरू जन्मानंतर अधिक काळ जीवित राहू शकले नाही. 

हे पण वाचा :- मानलं गुरुजी ! शिक्षकाच्या नोकरीला ठोकला राम-राम सुरु केली शेती; फुलशेतीतून कमवताय दिवसाला 3 हजार, वाचा ही यशोगाथा

अवघ्या अर्ध्या तासात हे वासरू मरण पावले आहे. यासारख्या दिसणाऱ्या बछड्या बाबत जाणून घेण्याची कमालीची उत्सुकता नागरिकांमध्ये पाहायला मिळाली. ज्या लोकांनी या वासरूला पाहिले त्यांनी याला निसर्गाचा चमत्कारच म्हटले आहे. तर संशोधकांनी अन पशुवैद्यकीय लोकांनी गर्भाशयात दोष असल्यामुळे ही घटना घडली असल्याचे नमूद केले आहे.

ही अनोखी आणि दुर्मिळ घटना घडल्यानंतर गाईची तपासणी करण्यात आली या तपासणीत गाई पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे समजले आहे. दरम्यान या प्रकरणावर अधिक संशोधनाची गरज असल्याचे मत देखील काही तज्ञांच्या माध्यमातून व्यक्त झाले आहे.

हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचा ‘हा’ महत्त्वाचा टप्पा पूर्ण, ‘या’ महिन्यात सुरू होणार एमटीएचएल प्रकल्प