Vodafone Idea Share Price : सध्या शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या कंपन्यांकडून आपले तिमाही निकाल जाहीर केले जात आहेत. तसेच काही कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअरची आणि डिविडेंट देण्याची सुद्धा मोठी घोषणा करत आहे. यामुळे शेअर बाजारात अनेक स्टॉक सध्या फोकस मध्ये आहेत. दरम्यान कंपन्यांकडून तिमाही निकाल जाहीर झाल्यानंतर काही कंपन्यांच्या स्टॉकला अप्पर सर्किट लागत आहे तर काही कंपन्यांचे स्टॉक दिवसेंदिवस घसरत आहेत.
व्होडाफोन आयडिया लिमिटेडने सुद्धा नुकतेच आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. यानंतर आज बुधवार 12 फेब्रुवारी 2025 रोजी कंपनीचे शेअर्स फोकसमध्ये राहिलेत. कंपनीचे शेअर्स आज ट्रेडिंग दरम्यान 8% पेक्षा जास्त घसरले आणि 8.10 रुपयांच्या इंट्राडे नीचांकी पातळीवर पोहोचलेत. याआधी मंगळवारी हा शेअर 8.82 रुपयांवर बंद झाला होता.

दरम्यान शेअर्समध्ये होणारी ही घसरण गुंतवणूकदारांची चिंता वाढवत आहे. या स्टॉक मध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार आता हा स्टॉक होल्ड करावा की सेल करावा? असा प्रश्न उपस्थित करत आहेत. म्हणून आता आपण या स्टॉकसाठी स्टॉक मार्केट विश्लेषकांनी नेमका काय सल्ला दिला आहे? कंपनीचे तिमाही निकाल कसे राहिले आहेत? याचा एक आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कंपनीचे तिमाही निकाल कसे राहिलेत?
चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत दूरसंचार कंपनी वोडाफोन आयडियाचा तोटा कमी होऊन 6,609.3 कोटी रुपयांवर आला आहे. कंपनीने मंगळवारी शेअर बाजारांना ही माहिती दिली. आर्थिक वर्ष 2024-25 च्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत कंपनीचे परिचालन उत्पन्न 11,117.3 कोटी रुपये होते, जे मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीपेक्षा चार टक्के जास्त आहे.
एकत्रित आधारावर, या तिमाहीत कंपनीचा तोटा रु. 6,609.3 कोटी होता, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत रु. 6,985.9 कोटी होता. कंपनीचा प्रति ग्राहक महसूल (ARPU) चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत 173 रुपये होता, तर जुलै-सप्टेंबर तिमाहीत तो 166 रुपये होता.
हे अनुक्रमिक आधारावर 4.7 टक्क्यांनी वाढले आहे. म्हणजेच गेल्या तिमाहीच्या तुलनेत या तिमाहीमध्ये कंपनीचा परफॉर्मन्स थोडा बरा झाला आहे. मात्र असे असले तरी कंपनी अजूनही तोट्यातच आहे आणि याचा नकारात्मक परिणाम होतोय. तिमाही निकालामुळेच आता कंपनीचे स्टॉक जोरदार आपटले आहेत. दरम्यान आता आपण या स्टॉकबाबत ब्रोकरेजचे नेमके काय म्हणणे आहे? याचा आढावा घेऊयात.
ब्रोकरेजचे म्हणणे काय?
खरेतर, या शेअर्सच्या तीव्र घसरणीचे कारण डिसेंबर तिमाहीचे निकाल आहेत. याशिवाय ब्रोकरेज कंपन्याही आता या स्टॉकवर विशेष सतर्क असल्याचे दिसत आहे. व्होडाफोन आयडिया कव्हर करणाऱ्या 22 विश्लेषकांपैकी 12 ने या स्टॉकला ‘सेल’ रेटिंग दिली आहे म्हणजेच हा स्टॉक विकण्याचा सल्ला दिला आहे अन सहा जणांनी ‘होल्ड’ करण्याचा सल्ला दिला आहे.
तसेच चार जणांनी यासाठी ‘बाय’ रेटिंग दिली आहे. CLSA ने Vodafone Idea वर ‘अंडरपरफॉर्म’ रेटिंग दिले आहे आणि लक्ष्य किंमत 6 रुपये प्रति शेअर ठेवली आहे. मॅक्वेरीलाने या स्टॉकवर ‘न्यूट्रल’ रेटिंग आहे, यासाठीची टारगेट प्राईस 7 रुपये ठेवली आहे.
ग्लोबल ब्रोकरेज फर्म गोल्डमन सॅक्सने व्होडाफोन आयडियासाठी सर्वात कमी टारगेट प्राईस निश्चित केली आहे या ब्रोकरेजने यासाठी फक्त 2.4 रुपयांची टारगेट प्राईस ठेवली आहे. त्याच वेळी, UBS ने Vodafone Idea वर 13 रुपये टार्गेट प्राईस ठेवून यासाठी बाय रेटिंग दिली आहे. Ambit Capital ने यासाठी 15 रुपयांचे टारगेट प्राईस निश्चित केले आहे.