कलिंगड शेतीने शेतकऱ्याच्या आयुष्यात आणला गोडवा; 10 गुंठ्यातला प्रयोग ठरला लाख मोलाचा, पहा ही यशोगाथा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Watermelon Farming : पुणे जिल्ह्यातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून शेतीमध्ये मोठे बदल करत आहेत. वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपलं वेगळंपण सिद्ध केलं आहे. खरं पाहता पारंपारिक पिकांच्या शेतीमध्ये शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी आता पारंपारिक पिकाला पर्यायी पिकाचा शोध घेऊ लागले आहे.

भोर तालुक्यातील मौजे माळेवाडी येथील एका शेतकऱ्याने देखील असाच एक प्रयोग केला आहे. खरं पाहता, भोर तालुका हा भात उत्पादनासाठी संपूर्ण राज्यात ओळखला जातो. मात्र भात पिकासाठी येणारा उत्पादन खर्च पाहता आता येथील शेतकरी इतर पर्याय पिकाच्या शोधात आहेत. तसेच काही शेतकरी भात पिकाची शेती तर करतच आहेत शिवाय इतर हंगामी पिकांच्या शेतीमध्ये देखील आपले नशीब आजमावत आहेत.

हे पण वाचा :- पुणे, कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी ! कोकण रेल्वेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; पहा….

तालुक्याच्या माळेवाडी येथील शहाजी कुमकर या प्रयोगशील शेतकऱ्याने भात पिकासोबतच कलिंगड पिकाच्या शेतीत आपलं नशीब आजमावला आहे. शहाजी यांनी भात पिकाची काढणी झाल्यानंतर कलिंगडची लागवड केली. भात पीक काढणीनंतर जमिनीची मशागत करण्यात आली आणि त्यानंतर कृषी विभागाच्या सल्ल्याने कलिंगडची रोपे मागवून याची शेती सुरु केली.

कलिंगड लागवडीनंतर पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करण्यात आला. तसेच मल्चिंग पेपरचा वापर करून कलिंगडची लागवड करण्यात आली असल्याने पाण्याची बचत झाली शिवाय तण नियंत्रणात ठेवण्यास मदत झाली. शहाजी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी कलिंगडच्या मेलोडी आणि शुगर क्वीन या दोन जातीची लागवड केली आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; ‘या’ शेतकऱ्यांना विहिरीसाठी अडीच लाख अन शेततळ्यासाठी 1 लाख रुपये अनुदान मिळणार; तुम्हाला लाभ मिळणार का? पहा…..

त्यांनी दहा गुंठ्यात याची लागवड केली असून संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने कलिंगड शेती यशस्वी करून दाखवली आहे. विशेष बाब म्हणजे विक्रीचे व्यवस्थापन करताना त्यांनी व्यापाऱ्याला थेट विक्री न करता गावोगावी फिरून आपला शेतीमाल विक्री केला आहे. याला दहा रुपये प्रति किलो ते तीस रुपये प्रति किलो असा दर मिळाला आहे.

यातून त्यांना जवळपास 35 ते 40 हजारापर्यंतची निव्वळ कमाई झाली आहे. म्हणजेच एकरी जवळपास दीड लाखांपर्यंतची कमाई त्यांना झाली आहे. कलिंगड शेतीचा हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. यामुळे भविष्यात असेच नवनवीन प्रयोग करू असा निर्धार देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवला आहे.

हे पण वाचा :- साताऱ्याच्या शेतकऱ्याचा नादखुळा ! कलिंगडच्या पिकातून दोन महिन्यात कमवले 6 लाख, परिसरात रंगली एकच चर्चा