येत्या 48 तासात राज्यातील ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार; हवामान विभागाचा ईशारा, पहा तुमच्या जिल्ह्यात कस राहणार हवामान?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Weather Update : राज्यात सातत्याने हवामान बदलत आहे. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात अवकाळी पावसाने त्राहीमाम माजवला होता. मुसळधार पाऊस अन गारपिटीमुळे रब्बी हंगामातील काढणीसाठी आलेल्या आणि फळबाग तसेच भाजीपाला वर्गीय पिकांना मोठा फटका बसला आहे.

दरम्यान आता पुन्हा एकदा राज्यात पाऊस बरसु लागला आहे. काल राज्यातील नासिक, अहमदनगर जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे. शिवाय आज देखील राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो सावधान ! ‘या’ प्रकारच्या कापसाचे उत्पादन घेऊ नका; कृषी विभागाचा गंभीर इशारा

हवामान विभागाने आत्ताच पुढील 48 तासात राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज 15 मार्च रोजी राज्यातील पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे.

विशेषता पुढील 48 तास अति महत्त्वाचे राहणार असून या कालावधीमध्ये वर नमूद केलेल्या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अवकाळी कोसळणार आहे. या सोबतच भारतीय हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यात पावसाची शक्यता कायम राहणार असल्याचा अंदाज बांधला आहे. मुंबई, पालघर, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गडचिरोली हे जिल्हे वगळता राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे.

हे पण वाचा :- कौतुकास्पद ! कांद्याला भाव मिळेना म्हणून पुण्याच्या शेतकऱ्याने केला ‘हा’ प्रयोग; आता लाखोंच्या घरात जातोय कमाईचा आकडा

निश्चितच, पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकरी बांधवांनी आपल्या शेती पिकांची आणि आपल्या पशुधनाची काळजी घेण्याचे आवाहन यावेळी केले जात आहे. भारतीय हवामान विभागा व्यतिरिक्त परभणीचे हवामान तज्ञ पंजाबराव ढक यांनीदेखील राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. डख यांनी आज विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज बांधला आहे.

यासोबतच उद्यापासून यवतमाळ, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, जळगाव, नाशिक, निफाड, नंदुरबार अहमदनगर या जिल्ह्यात 19 मार्चपर्यंत पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस 16, 17, 18 मार्च रोजी पडणार आहे.

डख यांच्या मते या कालावधीमध्ये राज्यात सर्व दूर पाऊस राहील. पाऊस नसला तर त्या ठिकाणी वादळी वारा वाहण्याची शक्यता मात्र कायम आहे. निश्चितच डखं आणि हवामान विभाग यांनी पावसाची शक्यता वर्तवली असल्याने शेतकऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

हे पण वाचा :- पंजाबरावांचा हवामान अंदाज पुन्हा ठरला खरा ! पावसाला सुरवात; आजपासून ‘या’ जिल्ह्यात ‘इतके’ दिवस मुसळधार पाऊस अन गारपीट, पहा डख काय म्हटले