आनंदाची बातमी ! आता तालुका स्तरावरही हवामान अंदाज मिळणार, सर्व्यात आधी ‘या’ दोन जिल्ह्यात होणार सुरवात, वाचा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Weather Update : शेतकरी बांधवांना अनेकदा निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीमधून अपेक्षित अस उत्पादन मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागतो.

पण जर अचूक हवामान अंदाज शेतकऱ्यांना वेळेत मिळाला तर त्यांना नैसर्गिक आपत्ती पासून आपल्या शेती पिकांचे संरक्षण करता येणार आहे. सध्या हवामान अंदाज वर्तवला जातो पण हा हवामान अंदाज जिल्हास्तरावर दिला जातो.

तालुकास्तरावर अद्याप हवामान अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवला जात नाही. मात्र आता लवकरच तालुकास्तरावरही हवामान अंदाज मिळणार आहे. यासाठी राज्य शासनाने एक विशेष यंत्रणा विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे पण वाचा :- कडू कारल्याचा मधुर गोडवा ! प्रयोगशील शेतकऱ्याने 10 गुंठ्यात सुरु केली कारल्याची शेती, 2 लाखांची झाली कमाई, पहा ही यशोगाथा

यासाठी शासनाकडून तयारी देखील सुरू करण्यात आली आहे. सर्वप्रथम पुणे आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यात या यंत्रणेचा पथदर्शी प्रकल्प राबवला जाणार आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, भारतीय हवामान विभाग (आयएमडी), भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्था (आयआयटीएम), भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा (जीएसडीए), भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जीएसआय), भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी, मुंबई) आणि राज्याचा कृषी विभाग यांच्या मदतीने ही विशेष यंत्रणा तयार केली जाणार आहे. आतापर्यंत तालुकास्तरावरील हवामान अंदाज नागरिकांसाठी उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना वेगवेगळ्या संकटांचा सामना करावा लागतो.

हे पण वाचा :- म्हाडाची कोकण मंडळाची लॉटरी आज निघणार; घरबसल्या म्हाडाची सोडत कशी पाहणार? पहा….

मात्र आता राज्य शासनाने यासाठी पुढाकार घेतला असून एक विशेष यंत्रणा तयार होणार असल्याने याचा निश्चितच सामान्य जनतेला आणि शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार या यंत्रणेची अंमलबजावणी ही पुणे आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यात सर्वप्रथम केले जाणार आहे. त्यासाठी तयारी सुरू झाली असून आगामी काही महिन्यात ही स्पेशल यंत्रणा या दोन जिल्ह्यात सक्रिय होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.

शेती करताना हवामानाचा अचूक अंदाज जर मिळाला तर शेतीची कामे करताना योग्य नियोजन आखता येते यामुळे राज्य शासनाने घेतलेला हा पुढाकार निश्चितच शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

हे पण वाचा :- मोठी बातमी ! आता मुंबईहुन ‘या’ शहरा दरम्यान सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस, खासदार उदयनराजे यांनी घेतला पुढाकार