23 रुपये प्रति किलोने विकला जाणारा गहू 1986 मध्ये काय किलोने विकला जात होता ? जून बिल पाहून तुम्हालाही बसेल धक्का

सध्या भारतीय बाजारांमध्ये गव्हाचे किरकोळ दर 23 रुपयांपासून ते 80 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचलेले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये गव्हाचे भाव दुपटीने वाढले आहेत. पण तुम्हाला 1987 मध्ये गव्हाला काय भाव मिळत होता याची कल्पना आहे का? नाही ना मग आज आपण याच बाबत माहिती पाहणार आहोत.

Published on -

Wheat Rate : सध्याचे युग सोशल मीडियाचे युग आहे आणि या सोशल मीडियाच्या युगात काय, कधी आणि कसे व्हायरल होईल हे काय सांगता येत नाही. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियामध्ये एक गव्हाचे जुने बिल प्रचंड व्हायरल होत आहे. खरे तर सध्या स्थितीला जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत.

त्यामुळे सर्वसामान्यांचे पार कंबरडे मोडले गेले आहे. पेट्रोल, डिझेल, गॅससहित खाद्यपदार्थांच्या किमती गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत आणि यामुळे महागाईरुपी हा भस्मासुर सर्वसामान्यांना धड मरूही देत नाहीये आणि जगुही देत नाहीये.

या वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांमध्ये सरकारच्या धोरणात्मक निर्णयांवर नाराजी पाहायला मिळतं आहे. अशातच आता सोशल मीडियामध्ये 1987 सालचे एक जुने बिल व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्यावेळी गव्हाला काय भाव मिळत होता? हे दिसत आहे.

1987 मध्ये गव्हाचा भाव कसा होता?

भारतात गव्हाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. खाद्यपदार्थांमध्ये गव्हाचा वापर सर्वाधिक होतो. भारतात सर्वात जास्त गहू पिकवला जातो आणि गव्हाची खपतही आपल्या देशात फारच अधिक आहे. पाव ब्रेड मैदा अशा पदार्थांसहित चपाती आणि इतर अन्य खाद्यपदार्थ बनवण्यातही गव्हाचा वापर होतो.

मात्र अलीकडे गव्हाच्या किमती फारच वाढलेल्या आहेत. सध्या किरकोळ बाजारात गव्हाची किंमत 23 रुपयांपासून ते 80 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचलेली आहे. म्हणजेच गव्हाच्या क्वालिटीनुसार किंमत बदलते. मात्र 1987 मध्ये गव्हाची किंमत ही फारच कमी होती.

सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेल्या गव्हाच्या बिलात असे नमूद आहे की, 1987 मध्ये गहू फक्त 1.7 रुपये प्रति किलो या दरात विकला जात होता. म्हणजेच त्याकाळी गव्हाची किंमत दोन दोन रुपये प्रति किलो एवढी सुद्धा नव्हती.

यावरून त्याकाळी जीवनावश्यक वस्तूंच्या किमती किती कमी होत्या हेच दिसते. हेच कारण आहे की सोशल मीडियामध्ये वेगाने व्हायरल होणाऱ्या या बिलवर नेटकऱ्याकडून भन्नाट प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

https://x.com/ParveenKaswan/status/1609941054006104069?t=Ql7M8I2Gb2PGwgfUzd4M8Q&s=19

कुठले आहे जून बिल

सोशल मीडियामध्ये वेगाने व्हायरल होणारे गव्हाचे हे 1987 मधील बिल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर अपलोड करण्यात आले आहे. IFS ऑफिसर परवीन कासवान यांनी X वर 1987 मधील गव्हाच्या बिलाचा फोटो सामायिक केला आहे.

हे बिल फारच जूने आहे. या बिलात गहू प्रति किलो 1.6 रुपयांना विकला जायचा असे दिसते. ऑफिसर परवीन कासवान यांच्या आजोबांनी हा गहू त्याकाळी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला विकला होता.

दरम्यान हे बिल सोशल मीडियावर अपलोड झाल्यानंतर त्याला नेटकार्‍यांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळतोय आणि सध्या हे बिल विविध ठिकाणी शेअर केले जात आहे.

व्हाट्सअप, instagram अशा अन्य प्लॅटफॉर्मवर देखील हे बिल शेअर होत आहे आणि एक्स या प्लॅटफॉर्मवर देखील अनेकांकडून या बिलाचा फोटो रिपोस्ट केला जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!