Cibil Score : काय सांगता ! ‘या’ छोट्या चुकांमुळे खराब होतो सिबिल स्कोर; सावध व्हा, नाहीतर कोणतंच कर्ज मिळणार नाही

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Which Factor Effect Cibil : प्रत्येकाला कधी ना कधी बँकेकडून कर्ज घ्यावे लागत. वैयक्तिक कारणांसाठी, घर खरेदी करण्यासाठी किंवा नूतनीकरण करण्यासाठी, वाहन मोबाईल लॅपटॉप यांसारख्या वस्तू खरेदी करण्यासाठी प्रत्येकजण कर्ज घेतो. हे कर्ज घेताना मात्र आपल्याला बँकांच्या अटी आणि शर्तीचे पालन करावं लागतं. त्यामध्ये प्रामुख्याने बँकेकडून कर्ज घेणाऱ्या व्यक्तीच सिबिल तपासलं जातं.

सिबिल स्कोर किंवा क्रेडिट स्कोर हा कर्ज घेण्यासाठी अतिशय उपयुक्त घटक आहे. हा सिबिल स्कोर 300 ते 900 या संख्यदरम्यान गणला जातो. म्हणजेच ज्याचा सिबिल स्कोर चांगला त्याला कर्ज लवकर मिळतं. काही मीडिया रिपोर्टनुसार, ज्या व्यक्तींच सिबिल स्कोर 750 पेक्षा अधिक असतं अशा व्यक्तींना लवकरात-लवकर कर्ज मिळत.

मात्र ज्यांचा सिबिल स्कोर कमी असतो अशा व्यक्तींना कर्ज देण्यासाठी बँका टाळाटाळ करतात. यामुळे हा स्कोर चांगला ठेवणे आवश्यक आहे. यामुळे आज आपण सिबिल स्कोर का खराब होतो याविषयी जाणून घेणार आहोत.

सिबिल स्कोर किंवा क्रेडिट स्कोर खराब होण्याची कारणे खालीलप्रमाणे?

आपल्यापैकी अनेक जण क्रेडिट कार्ड होल्डर असतात. मात्र क्रेडिट कार्ड होल्डर अनेकदा त्यांना मिळालेल्या क्रेडिट लिमिट पैकी 50 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक लिमिट वापरत असतात. याचाच अर्थ अशी व्यक्ती ही आपल्या गरजा भागवण्यासाठी कर्जांवर अवलंबून असल्याचे गृहीत धरले जाते. यामुळे सिबिल स्कोर वर याचा सरळ परिणाम होतो. परिणामी हा स्कोर खराब होतो. यामुळे क्रेडिट लिमिट पैकी केवळ 30 टक्के लिमिट वापरली पाहिजे असा तज्ञ सल्ला देतात.

अनेकदा फोन, पाणी, वीज, क्रेडिट कार्ड बिल किंवा इतर कोणत्याही प्रकारचे देणे वेळेवर संबंधित व्यक्तींकडून भरले जात नाहीत. हे देखील सिबिल स्कोर कमी करण्यासाठी कारणीभूत ठरत असते. याशिवाय अनेकजण पूर्ण पेमेंट करत नाहीत. कर्जाचे ई एम आय पूर्ण भरले नाहीत तरीही परिणाम म्हणून सिबिल स्कोर इफेक्ट होतो. त्यामुळे वेळेवर पेमेंट करणे आणि पूर्ण पेमेंट करणे आवश्यक ठरते.

अनेक लोकांचे संयुक्त खाते असते. यामुळे अशा व्यक्तीनी आपल्या खात्यासोबतच सह खात्यावर देखील लक्ष ठेवणे आवश्यक आहे. सह खातेधारकांनी जर वेळेवर कर्जाचे हप्ते किंवा इतर थकबाकी भरली नाही तरी देखील याचा परिणाम म्हणून सिबिल स्कोर इफेक्ट होतो. म्हणून याची देखील काळजी घेणे गरजेचे आहे.

आपल्यापैकी अनेक जण सिबिल स्कोर चेक करत नाही. यामुळे देखील हा स्कोर होत असतो. दर चार महिन्यांनी सिबिल अहवाल चेक केला पाहिजे असं मत काही लोक व्यक्त करतात.

अनेक जण नवीन क्रेडिट कार्ड घेण्यासाठी किंवा कर्ज घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज करतात. असं एकाच वेळी अनेक ठिकाणी अर्ज करणे देखील सिबिल स्कोर कमी करण्यास कारणीभूत ठरतो. त्यामुळे ही देखील चूक टाळणे गरजेचे आहे.