अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2022 Formal success story  :- शेती हा एक व्यवसाय (Farming Business) आहे आणि व्यवसायात काळाच्या ओघात बदल करणे अति महत्त्वाचे ठरते.

कुठल्याही व्यवसायात काळाच्या ओघात बदल झाला नाही तर तो व्यवसाय घाट्याचा सौदा सिद्ध होऊ शकतो. आपल्या डोळ्यासमोर नोकिया मोबाईल कंपनीचे एक जिवंत उदाहरण आहे नोकिया कंपनीने देखील काळाच्या ओघात तंत्रज्ञानाचा बदल स्वीकारला नाही यामुळे जी कंपनी एकेकाळी अव्वलस्थानी होती ती कंपनी आता जणूकाही मार्केटमधून हद्दबाहेरच झाली आहे.

अगदी याप्रमाणेच शेती व्यवसाय देखील काळाच्या ओघात बदल करणे अतिशय महत्त्वाचे आहे. आता अनेक नवयुवक शेतकरी (Farmer) काळाच्या ओघात शेतीत बदल देखील करू लागले आहेत.

आता नवयुवक शेतकरी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून हायटेक पद्धतीने शेती करू लागले आहेत. असाच एक नवीन आणि अभिनव बदल पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्याच्या माळवाडी शिवारातील एका तरुण शेतकऱ्याने केला आहे.

माळवाडी शिवारातील किरण यादव या नवयुवक शेतकऱ्याने मशागत (Cultivation) विना शेती करण्याची किमया साधली आहे.

शून्य मशागत (Zero cultivation) करून शेती केली तर उत्पादनात वाढ (Production) होते याशिवाय उत्पादन खर्चात मोठी बचत होते.

किरण यादव यांचा हा अभिनव उपक्रम पाहण्यासाठी विदेशी पाहुण्यांनी आता चक्क बांधावरच हजेरी लावली आहे. या अभिनव उपक्रमाबद्दल किरण यांना अनेक प्रतिष्ठित मंचांवर सन्मानित करण्यात आले आहे.

मायबाप शासनाने देखील त्यांच्या अभिनव उपक्रमाची दखल घेत त्यांना अनेक प्रकारची पारितोषिके देऊन त्यांचा सत्कार केला आहे.

किरण यादव यांचा हा प्रयोग आजूबाजूच्या पंचक्रोशीतील तसेच राज्यातील इतर शेतकऱ्यांसाठी देखील प्रेरणादायी ठरू शकतो.