Success Story : शेतकरी बांधवांना (Farmer) गेल्या अनेक दशकांपासून शेतीमध्ये (Farming) सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने आता नवयुवक शेतकरी पुत्र शेती (Agriculture) पासून दुरावत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे देशात असे देखील अनेक नवयुवक आहे जे आपल्या मेहनतीच्या जोरावर आणि योग्य नियोजनाने शेतीमधून लाख रुपये उत्पन्न (Farmer Income) कमवत आहेत.

एवढेच नाही तर काही नवयुवक तरुण आपली चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेतीकडे वळू लागले आहेत. असे नवयुवक आपल्या ज्ञानाचा योग्य वापर करून शेतीतून लाखों रुपये उत्पन्न कमावण्याची किमया देखील साधत आहेत.

हरियाणा राज्यातील करनाल जिल्ह्याच्या मौजे घरोंदा येथील नवयुवक तरुणाने (Successful Farmer) देखील आपली विदेशातली नोकरी सोडून मायदेशी परतत शेतीच्या माध्यमातून यशाला गवसणी घातली आहे. नवयुवक तरुण शेतकरी कुलदीप राणा (Farmer Success Story) यांनी देशातली आपली नोकरी सोडून आपल्या गावी परतत ड्रॅगन फ्रुटची शेती (Dragon Fruit Farming) सुरू केली आहे.

ड्रॅगन फ्रुट लागवडीतून कुलदीप यांना चांगली बक्कळ कमाई झाली असून सध्या हा नवयुवक तरुण चांगलाच चर्चेत आला आहे. दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या कुलदीप या तरुण शेतकऱ्याने सांगितले की, 2019 मध्ये परदेशातुन परतल्यानंतर त्याने अर्धा एकर जमिनीतून ड्रॅगन फ्रूटची (Dragon Fruit Crop) लागवड करण्यास सुरुवात केली. कोणतेही काम कठोर परिश्रम आणि झोकून देऊन केले तर त्यात यश नक्कीच मिळते, असे शेतकरी कुलदीप सांगतात.

कारण शेतकर्‍यांना आता कमी जमीन मिळत आहे आणि त्यांना कमी जमिनीत शेती करून लाखो कमवायचे आहेत पण भात आणि गहू या पारंपरिक शेतीत ते शक्य नाही. अशा परिस्थितीत कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी ड्रॅगन फ्रूटची लागवड हा मोठा चांगला आणि फायदेशीर पर्याय आहे. याच्या शेतीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे खर्चही कमी होतो आणि पाण्याची बचतही होते.

याशिवाय उत्तम उत्पादन मिळते. जर आपण त्याच्या किंमतीबद्दल बोललो तर फळाचे वजन 300 ते 400 ग्रॅम पर्यंत असते. बाजारात एका ड्रॅगन फ्रूटचा दर 80 ते 100 रुपयांपर्यंत आहे. एका खांबावर ड्रॅगन फ्रुटचे 10 किलो ते 12 किलोपर्यंत फळे मिळतात.

या युवक शेतकऱ्याच्या मते, ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीचे सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या झाडांना कीड लागत नाही. आजपर्यंत त्याच्या झाडांवर कोणत्याही प्रकारची कीड किंवा रोग आढळून आलेला नाही. अशाप्रकारे, त्याच्या लागवडीमध्ये कीटकनाशकांचा वापर नगण्य आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचा कीटकनाशकांवर होणारा खर्च वाचतो.

या शेतीच्या फायद्याचा अंदाज यावरून लावता येतो की 20 एकरात पारंपारिक शेती केली जात असेल आणि त्यातून मिळणाऱ्या नफ्याची तुलना केली तर केवळ एक एकर ड्रॅगन फ्रूट लागवड पुरेसे आहे. या शेतकऱ्याने सांगितले की, नेपाळपर्यंतचे शेतकरी ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीची माहिती घेण्यासाठी त्यांच्याकडे आले आहेत.

कुलदीपने सांगितले की, या पिकात केवळ एका गुंतवणुकीनंतर सुमारे 25 वर्षे उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे ड्रॅगन फ्रूटची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. अल्पभूधारक शेतकरी पुत्र पैसे कमवण्यासाठी जन्मभूमी कडून शहराकडे प्रस्थान करतात, मात्र जर त्यांनी ड्रॅगन फ्रूटची शेती केली तर त्यांनादेखील लाखो रुपये घरबसल्या कमावता येऊ शकतात, असे या तरुण शेतकऱ्याने सांगितले आहे.